Breaking News यवतमाळ

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दिग्रस तालुक्यातील कलगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. अवधुत काशीराम राठोड वय-३५ वर्ष रा. लाख रायजी असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार मृतक हा कलगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकी क्र.एम.एच-२९ बी.झेंड ६०८६ ने जात असताना कलगाव फाट्याजवळ त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अवधुत राठोड याला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिग्रस पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृतकाच्या पश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुली,एक मुलगा असा आप्त परिवार आहे. घटनांची माहिती मिळतास गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Copyright ©