यवतमाळ सामाजिक

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे अनावरण

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे अनावरण

जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा अनावरण सोहळा लोणी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था व तसेच लहुजी शक्ती सेना व समाज बांधवांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे अवचित साधून शिवसेना आर्णि तालुकाप्रमुख शिंदे गटाचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेंद्रभाऊ जाधव यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे अनावरण करण्यात आले भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव वारंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये समाजातील चिमुकल्यांनी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला महिला भगिनींनी आपल्या गीतातून अण्णाभाऊंच्या कर्तुत्वाचा पाढा वाचला शीघ्र कवी धनराज रामटेके यांनी आपल्या काव्यातून अण्णाभाऊना मान वंदना अर्पण केली समाजातील जेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी आयोजिलेल्या या कार्यक्रमांमध्ये पांडुरंग देवकर बार्टीच्या संयोजिका भरणे ताई प्राचार्य चव्हाण सर वैद्यकीय अधिकारी डॉ उके साहेब व आदरणीय राजेंद्र भाऊ जाधव यांनी मौलिक मार्गदर्शन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव वारंगे सर यांनी नवोदित विद्यार्थी विद्यार्थिनीचा उत्साह वाढावा यासाठी अण्णाभाऊच्या जिवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली विजेत्यांना प्राचार्य विनोदजी भगत यांच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षीसे वितरित करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच अमोलभाऊ वारंगे शिवाजी पारधी योगेश भाऊ पाटील दिलीप नागपुरे आडे भाऊ हरिभाऊ दळवे केशवराव खाडे उपस्थित होते,जयंती समारोह प्रसंगी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

Copyright ©