Breaking News महाराष्ट्र

वादग्रस्त ठाणेदाराच्या निरोप समारंभातच एक माजी नगरसेवकाने ठाणेदाराला सुनावले खडे बोल.

देवळी प्रतिनिधी सागर झोरे 

वादग्रस्त ठाणेदाराच्या निरोप समारंभातच एक माजी नगरसेवकाने ठाणेदाराला सुनावले खडे बोल.

निरोप समारंभ ठरला वादग्रस्त.

जिल्ह्याला नवे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नुरुल हसन येण्या अगोदर देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या कार्यकाळात देवळी शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे उदयास आले होते. गल्लोगल्ली सर्रास दारू विक्री होत होती. देवळी,वर्धा रोडच्य आजूबाजूला रस्त्या लगत अनेक खुलेआम दारू विक्रीचे बार सुरू झाले होते. देवळी शहराच्या इतिहासात कधी नव्हे असे रस्त्याच्या दुतर्फा सट्टापट्टी चे दुकाने लागली होती. देवळी तालुका व शहरातील तरुण वर्ग व्यसनाच्या अधीन गेला होता. गांजा, चरस याचीही सर्रास विक्री सुरू होती. प्रमाण इतके भयंकर वाढले होते की, टोळी युद्ध, हाणामारी, हल्ले अशा अनेक घटनांनी देवळी शहर जिल्ह्यात नावारूपास आले होते. देवळीतील नागरिकांनी ठाणेदार तिरुपती राणे यांना शहरात कधीही बघितले नव्हते. दारू, गांजा, सट्टा यांचे भयंकर प्रमाण वाढले होते. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असतांनाच देवळी शहरात सलग तीन गंभीर घटना घडल्या. देवळीतील एका धाब्यावरील युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर एका हॉटेल मालक व काम करणाऱ्यांवर तलवारीने हल्ला चढविन्यात आला. त्यानंतर एका युवकावर काही जणांनी हल्ला करून जखमी केले परंतु वेळीच गुन्हेगारांना अटक न केल्याने काही तासाच्या आत त्याच युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. अनेक त्यानंतर गावातील नागरिकांनी या घटना व अवैध धंद्या विरुद्ध आवाज उठविला मात्र गावातील काही नेत्यांच्या मदतीने ठाणेदाराने अवैध धंद्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या नागरिकांवर पत्रकार परिषद घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. देवळीतील काही नेत्यांनी समाजकारणातील, राजकारणातील आपला आपसी वचपा काढण्यासाठी ठाणेदार तिरुपती राणेंचा सहारा घेतल्याची चर्चा आहे. ठाणेदाराच्या आशीर्वादाने अवैध व्यवसाय देवळीत सुरू असल्याची नागरिकांची प्रचंड ओरड होती. यातच ठाणेदार तिरुपती राणे यांची बदली सेलू येथे करण्यात आली. शहरातील काही संधीसाधू वादग्रस्त ठाणेदाराच्या शरणार्थ्यांनी ठाणेदाराच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम देवळी येथे घेण्यात आला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या भाषणातून ठाणेदार तिरुपती राणे चे उपकार फेडत गुणगान गात होते. परंतु याच वेळी देवळीतील एका माजी नगरसेवकाने कार्यक्रमाचा ताबा घेत आपल्या भाषणातून ठाणेदार तिरुपती राणे यांच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढले. सर्व जण गुणगान गात असतानाच माजी नगरसेवकाने ठाणेदाराला भर निरोप समारंभात खडे बोल सुनावल्याने सर्वांची तारांबळ उडाली. अवैध धंद्यांवरून ठाणेदाराला चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा सर्वत्र जोर धरत आहे. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या गटाचेच हे माजी नगरसेवक असल्याने वादग्रस्त ठाणेदारावर खोटी स्तुतीसुमने उधळणाऱ्या लोकांची गोची होऊन आयोजक स्वतःच तोंडघशी पडल्याची सर्वत खमंग चर्चा आहे. अनेक अवैध व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठाणेदारांनी केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. ठाणेदार तिरुपती राणे देवळीतून जातांना सुद्धा त्यांचे वाईट कर्म पिच्छा सोडत नसल्याचे त्यांच्या निरोप समारंभातून उघड झाले. माजी नगरसेवकाच्या एका भाषणाने निरोप समारंभ उधळून लावला. शेवटी वादग्रस्त ठाणेदाराचा निरोप समारंभ सुद्धा भत्यांच्याप्रमाणे वादग्रस्त झाल्याची एकच चर्चा देवळी शहरात जोर धरत आहे. आता हेच वादग्रस्त ठाणेदार सेलू येथे काय करतात याकडे लक्ष लागले आहे.

Copyright ©