यवतमाळ सामाजिक

६ऑगस्त ला यवतमाळ येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

६ऑगस्त ला यवतमाळ येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

पाच जि्ह्यांधिकारी करणार यूपीएससी व एमपीएससी चे मार्गदर्शन

समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळ तथा करिअर ॲक्सेस पॉईंट स्पर्धा परीक्षा अकादमी यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ऑगस्त २०२३ ला सकाळी ११ वाजता महेश भवन संकट मोचन रोड यवतमाळ येथे upsc -mpsc स्पर्धा परिक्षा कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत ला डॉ. हर्षदीप कांबळे सचिव उद्योग मंत्रालय मुंबई, डॉ. पंकज आशिया जिल्हाधिकारी यवतमाळ, डॉ. पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, डॉ. मनीष नारनवरे अतिरिक्त जिल्हाधिकारी तामिळनाडू, अनिल खडसे उपायुक्त आयकर विभाग छत्तीसगड, डॉ. मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, कार्तिकीयन एस उपविभागीय अधिकारी पुसद, यासिनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापूर, व नरेंद्र फुललेले अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी आयोगाच्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यासाचे नियोजन कसे करावे. कमी कालावधीमध्ये अभ्यास करून यश कसे मिळवावे.अभ्यासामध्ये सातत्य राखून वेळेचे नियोजन कसे करावे. कोणते संदर्भ ग्रंथ वाचावेt.नोट्स कशा काढाव्यात, स्पर्धा परीक्षेची करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणीची सोडवणुक कशी केली जाईल. तसेच या कालावधीमध्ये येणाऱ्या ताण तनावाला कसे सामोरे जावे.याबाबतचे मार्गदशन यशाचे शिलेदार करणार आहेत. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रात आणि देशांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या विविध जागी विषयीच्या जाहिराती प्रकाशित झालेल्या असून त्याबाबतचा अभ्यास सध्या विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करीत आहेत त्यांना या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा हेतू या कार्यक्रमाचा आहे.

या मार्गदर्शनाचा लाभ विद्याथ्यानी घ्यावा असे आवाहन समताप्रव प्रतिष्ठान यवतमाळ तथा करिअर ॲक्सेस पॉईंट स्पर्धा परीक्षा यवतमाळने केले आहे.

Copyright ©