महाराष्ट्र सामाजिक

शेतकरी व निराधारांची अडवणूक करणाऱ्या सेंट्रल बँकेवर कारवाईची तहसीलदारांना निवेदनातून मागणी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- पंकज तडस

शेतकरी व निराधारांची अडवणूक करणाऱ्या सेंट्रल बँकेवर कारवाईची तहसीलदारांना निवेदनातून मागणी

सेलू तालुक्यातील झडशी येथील सेन्ट्रल बँकेत कोणीच जबाबदार अधिकारी नसल्याने शेतकरी व निराधार योजनेतील लाभार्थ्यांची बोळवण होत आहे, बँकेच्या या अनागोंदी कारभारावर अंकुश लावण्यात यावा अशी मागणी आज ता, 2 बुधवारला भारतीय जनता युवा मोर्चाचे वर्धा जिल्हा सचिव गौरव तळवेकर यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे,

शेतीचा हंगाम सुरू होऊन अडीच ते तीन महिने लोटले असून झडशी येथील सेंट्रल बँक शाखेत शेतकऱ्यांना क्रॉप लोणसाठी चकरा माराव्या लागत आहे, क्रॉप लोणची प्रकरणे अद्यापही प्रलंबीत आहे, तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून येनारी प्रकरणे प्रलंबित आहे, शासनाकडून मिळणारी किसान सन्मान निधी, पंतप्रधान किसान मदत निधीतील रक्कम कर्ज खात्यात वळती करण्यासाठी बळजबरी केली जात असल्याने ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम बँकेकडून सुरू आहे, तसेच संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी निराधार योजनेतील वृद्ध, विधवा, दिव्यांग निराधारांना त्यांना मिळणाऱ्या मदतीची रक्कम देण्यास बँकेकडून जाणून त्रास दिला जात आहे, झडशी येथील बँकेतील व्यवस्थापक गत महिनाभरापासून रजेवर गेले असून महत्वाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, एकूणच सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज भारतीय जनता युवा मोर्चाचे नेतृत्वात नागरिकांनी तहसीलदार स्वप्नील सोनवणे यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे, यावेळी भाजयुमोचे तालुका अध्यक्ष संकेत बारई, जिल्हा उपाध्यक्ष विकास मोटमवार , राजू झाडे, रोशन दुधकोहले , शुभम म्हारस्कोल्हे, गजू चाफले, यांचेसह शेतकरी व खातेदार उपास्थित होते,

Copyright ©