यवतमाळ सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

थोर समाज सुधारक साहित्यरत्न लोककवी लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती सावळी सदोबा येथे सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन उत्साहात साजरी केली सावळी सदोबा ग्रामपंचायत समोर असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैल चित्राला मान्यवरांनी पुष्प माला अर्पण करून जयंती साजरी केली.

यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश राठोड, सावळी सदोबा गावचे उपसरपंच अहेमद अली तंवर, मिलींद पाटील शिंदे, शामराव देवकते, राजु राऊत, अशोक जगताप, बालू गुंजकर, सुरेश राठोड, भिमराव नगराळे, दिलीप मुनेश्वर, शाबू सर्वे , दीपक संगमवार , अनिल संगमवार ,उमेश वानखडे, गजानन संगमवार , अमर संगमवार, गणेश आवनुरवार, अनिल वानखडे, भारत संगमवार, लक्ष्मण खंदारे , गणेश नल्लावार, गजानन आवनुरवार, सचिन संगमवार, पंकज पवार, सुरेश संगमवार, सुनील संगमवार, अनिल संगमवार ईत्यादी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.

Copyright ©