यवतमाळ सामाजिक

बोदड येथील पुरग्रस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ने दिली तहसील वर धडक

बोदड येथील पुरग्रस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ने दिली तहसील वर धडक

22 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपूर्ण जिल्हामध्ये नदी नाल्याना पूर आला होता यवतमाळ पासून जवळच असलेल्या बोदड गावात देखील हीच परिस्थिती होती येथील अनेक घरात पाणी घुसले तेथील 30 ते 40 कुटुंबाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे तलाठी येऊन करतील आणि आम्हला शासकीय मदत मिळते पण तसे झाले नाही तलाठ्यांनी येथील पंचनामे केले नाही हीच माहिती बोदड येथील पुरग्रस्तानी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रफुल्ल देशमुख यांना दिली त्यांनी लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या क्रांतीताई धोटे यांना सांगून त्यांनी सर्व बाधित कुटुंबाना सोबत घेऊन तहसील कार्यालय वर धडक दिली. सर्ववस्तू स्थिती क्रांतीताई धोटे यांनी तहसीदार याना अवगत करून दिली. तहसीलदार यांनी तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले 2 दिवसात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान येथील देण्याचे तहसीलदार यांनी आश्वासन दिले. तारीकभाई लोखंडवाला जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,योगेश धानोरकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,लाला राऊत, यवतमाळ शहर अध्यक्ष, उत्तम गुल्हाने, प्रफुल देशमुख, किशोर नरांजे आकाश चंदनखेडे, तन्मय त्रिवेदी नयन लुंगे,झाकीर शेख व बोदड येथील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©