यवतमाळ सामाजिक

कॉमनमॅनच्या पुतळ्याची सर्वसामान्य व्यक्तींनी केली साफसफाई

कॉमनमॅनच्या पुतळ्याची सर्वसामान्य व्यक्तींनी केली साफसफाई

यवतमाळ शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते नगरपरिषद येथे पूरग्रस्त वाघाडी येथे उदभवत असलेल्या समस्यांना लवकरत लवकर नगरपरिषदे मार्फत उपाययोजना करण्यात यावे या साठी निवेदन देण्यासाठी गेले होते, उपस्थित कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले, निवेदन दिल्यानंतर त्यांना दिसले की या पूर्वीच अनावरण झालेल्या पुतळा मागील एक वर्षा पासून पॉलिथिनने झाकून असलेल्या सर्वसामान्य माणसाचा प्रतिकात्मक “कॉमनमॅन” चा पुतळा पॉलिथिनने तसाच अनेक महिन्या पासून झाकून आहे, त्यांना ही बाब निर्दशनात आल्या नंतर त्यांनी सर्वसामान्य माणसाचा प्रतिकात्मक पुतळा “कॉमनमॅन” त्याची आज रोजी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफसफाई करून सर्व सामान्य जनतेसाठी मोकळा करून दिला या प्रसंगी नारी रक्षा समितीचे विनोद दोंदल, चेतना राऊत, ओलावा फाऊंडेशनचे राहुल दाभाडकर, निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अर्पित शेरेकर, किशोर बाभूळकर, ईश्वर येरके व वाघाडी येथील पूरग्रस्त नागरिक इत्यादी उपस्थित होते.

याच पद्धतीने अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेचे धूळखात असलेले प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावे असे सर्व जनतेची मागणी आहे….

Copyright ©