यवतमाळ सामाजिक

संजय राठोडांचा अविरत मदतीचा हात

संजय राठोडांचा अविरत मदतीचा हात

तीन हजार पूरग्रस्त कुटुंबाला किराणा साहित्य किट व अन्न छत्र सुरूच

दिग्रस :- २२ जुलैला आलेल्या महापूराने उध्वस्त केलेल्या तिन हजार कुटुंबाना शुक्रवार, २८ जुलै पासून किराणा साहित्यांची किट तर २४ तास अन्नछत्र खुले करणारे ८० टक्के समाज कारण आणि २० टक्के राजकारण’ शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे हे ब्रीद वाक्य सार्थक ठरविणारे ना.संजय राठोड यांनी मदतकार्य अविरत ठेवल्याने पुरग्रस्तांना आधार मिळला आहे.

येथे अनेक घरे महापूराने होत्याचे नव्हते झाले आहे,अनेकांच्या घरातील चीजवस्तू वाहून गेल्या ते अक्षरशः उघड्यावर आले अश्यांसाठी या विभागाचे आमदार, पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी उभे केलेले अन्नछत्र व दोन दिवसांपासून किराणा किट वाटप होत असल्याने हि मदत आणि तहसील कार्यालया कडून शासनाची पुरग्रस्त कुटुंबांना ५ हजाराची मदत या एकूण सहकार्याने अनेक पुरग्रस्त पूर्वपदावर येतांना दिसत आहेत. दिग्रस तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जेवण व किराणा साहित्य किट वाटपात व्यस्त आहेत.

शिवसेने कडून वितरीत होणाऱ्या जेवणात मिक्स भाजी,चपाती व भात तर कधी मसाला भात, बेसन, पुरीभाजी असा बदलता मेणू एका ठिकाणाहून शहरातील पुरग्रस्त भागातील घरोघरी वितरीत करण्यात येत आहे.किराणा साहित्य किट मध्ये ५ किलो आटा पाकिट, २ किलो तांदूळ, १ किलो साखर, १ किलो पोहा, १ किलो तेल, अर्धाकिलो तुरदाळ, १ पाव चटणी, अर्धापाव चहापत्ती, मिठपूडा व बिस्किट पाकिटे अशी हि १५ दिवस पुरणारी अन्न किटने पुरग्रस्तांना बरीच मदत होत आहे. पूर ओसरला तरी, ना.संजय राठोडांनी आटू दिला नाही मदतीचा झरा असे दिग्रसकरातून बोलल्या जात आहे. या सोबतच असे ते पुरग्रस्त ज्यांचे संपूर्ण घरच उद्ध्वस्त होऊन जे बेघर झालेत त्यांच्यासाठी सुद्धा भरीव मदत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ना.संजय राठोड करीत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

Copyright ©