यवतमाळ सामाजिक

गोर सेना गोर सिकवाडीच्या वतीने विद्यार्थीचे गुणगौरव समारोह

दारव्हा तालुका प्रतिनिधी” चेतन पवार

गोर सेना गोर सिकवाडीच्या वतीने विद्यार्थीचे गुणगौरव समारोह

रायसिना – फाउंडेशन महाराष्ट्र व गोर सिकवाडी- गोर सेना दारव्हा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बचत भवन सभागृह येथे २०२३ चालू वर्षात स्पर्धा परीक्षा, पीएचडी, नीट, सीईटी, दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ट , गुणाने मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह विविध परीक्षा क्षेत्रांमध्ये, कामगिरी केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार करण्यात आले,

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले,(शूरवीर श्री संत सेवालाल महाराज (हरित क्रांतीचे प्रणेते (वसंतरावजी नाईक साहेब ,) (गोरसेवाडी मुख्य संयोजक स्व,काशिनाथ नायक) (दानशूर लाखा बंजारा)यांच्या प्रतिमेला ,जळभोग पूजनाने दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सत्कार समारोह शहर व खेड्यातील चालू वर्षात स्पर्धा परीक्षा, पीएचडी, स्पर्धेच्या चांगल्या प्रकारचे यश संपादन करा असे प्रमुख उपस्थित प्रवक्तांनी सांगितले

या गुणगौरव समारोह कार्यक्रमात विद्यार्थीना, प्रमापत्र, डाकूमेंट फाईल व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीचा सत्कार केला, यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संत सेवालाल महाराज वसंतराव नाईक साहेब, मिठू भुकिया यांच्या जीवन चरित्रवर विद्यार्थीना प्रकाश टाकले , विद्यार्थी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत केली पाहिजे तरच अपेक्षित सर्व काही प्राप्त करता येते, वर्तमानपत्राचे वाचन केले तर दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी प्राप्त होतात ,असा मौलिक संदेश, गोर सेना फुल टायमर रवी खोला यांनी विद्यार्थ्यांना बोलताना संदेश दिला, व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी भविष्याच्या उज्वल पुढील वाटचाली शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिली, गोरसेना जिल्हाध्यक्ष किशोर पालतीया यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले,

गोर सेना गोरशिकवाडी यांच्या वतीने रायसीना फाउंडेशन गुणगौरव समारोह कार्यक्रम आयोजित केला ,यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे, भारत जाधव, भीमराव राठोड, डॉ दिलीप चव्हाण किशोर पालतिया,संतोष चव्हाण, धीरज राठोड, देवानंद चव्हाण, ईश्वर राठोड विशाल चव्हाण, सुमित पवार,

सूत्रसंचालन,- राजेश राठोड (गोर सेना तालुका अध्यक्ष ) अमोल पवार,बाळा चव्हाण, दिपक जाधव, लाखा चव्हाण, राहुल भुकिया, सर्व गोर सेनेचे पदधिकाऱ्यानी या कार्यक्रमात मोलाचे परिश्रम घेतले,

Copyright ©