यवतमाळ सामाजिक

वाघाच्या आगमनाने शेतकरी शेतकरी शेतमजूरान मध्ये दहशत

वाघाच्या आगमनाने शेतकरी शेतकरी शेतमजूरान मध्ये दहशत

जोडमोहा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर जंगल शिवारात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून मागील पंधरा दिवसात एका म्हशीवर हल्ला चढविला तर तीन जनावरांचा फडशा पाडला या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे परिणामी वन विभागाच्या वतीने गांधीनगर जंगल शिवारात कॅमेरा लावला असून वाघाच्या पावलाचे ठसे दिसून आले आहे कॅमेऱ्यात दिसणारे वाघाचे ठसे पाहून हे बिबट्याचे असल्याचा अंदाज वनविभागाच्या वतीने व्यक्त केल्या जात आहे यापुढे अशा घटना घडू नये म्हणून वन विभागाने परिसरात दवंडी देऊन शेतकरी शेतमजुरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास तयार नसून शेतीचे कामे ठप्प होत आहे यवतमाळ पांढरकवडा महामार्गावर गांधीनगर लगतच तलाव आहे येथील जंगल शिवारात चरण्यासाठी आलेल्या जनावरे या तलावावर पाणी पिण्यासाठी जातात वाघाच्या दहशतीमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्याला वाहनधारकासह प्रवाशास कमालीची भीती निर्माण झाली आहे शेतकरी शेतमजूर पशुधन मालकांचे जीव धोक्यात आले असून वन विभाग यांनी याची पूर्णता जबाबदारी घेऊन वाघापासून कसे संरक्षण देता येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे वन विभागाने पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरात शेतकरी व शेतमजूर पशुपालकाकडून होत आहे या वाघास वनविभागाने तातडीने बंदिस्त करून दुसरीकडे सोडण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानांची भरपाई वनविभागाने द्यावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

Copyright ©