यवतमाळ राजकीय

बेघर मनोरुग्णांना उद्धव ठाकरे शिवसेना यांनी दिले भोजनदान

बेघर मनोरुग्णांना उद्धव ठाकरे शिवसेना यांनी दिले भोजनदान

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना यवतमाळ तालुक्याच्या वतीने बेघर मनोरुग्णांना भोजनदान देण्यात आले रस्त्यावरील बेघर मनोरुग्ण यांची सेवा करणारी नंदादीप फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष संदीप शिंदे तसेच त्यांच्या टीमचा सत्कार शिवसेना यवतमाळ तालुक्याच्या वतीने करण्यात आला मनोरुग्णांना आधार देणारी संस्था त्याचप्रमाणे आई-वडिलांप्रमाणे त्यांची सेवा करणे यासाठी संदीप शिंदे यांचं कुटुंब अविरात्र झटत असते जे का रांजले गांजलेl त्याशी मनी जो आपुले lतोचि साधू ओळखावा lदेव तेथेचीजाणावाl संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या अभंगाप्रमाणे त्यांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अविरत काम करणाऱ्या समाजसेवकाला शिवसेना यवतमाळ तालुक्याच्या वतीने मानाचा मुजरा! या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे उपजिल्हाप्रमुख किशोर भाऊ इंगळे तालुकाप्रमुख संजय रंगे उपतालुकाप्रमुख गजानन पाटील संदीप सरोदे विभाग प्रमुख गणेश आगरे त्याचप्रमाणे पिंटू पाटील सावरकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव भवरे दिनेश चव्हाण माधव सोरडकर संजय मोहोड राजूभाऊ भागानगरकर उपस्थित होते यावेळी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उदंड निरोगीआयुष्यासाठी शिवसेना यवतमाळ तालुक्याच्या वतीने प्रार्थना करण्यात आली साहेबांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना नोटबुक वाटपाचे कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता परंतु प्रचंड पावसामुळे शाळेला सुट्टी दिल्यामुळे तो कार्यक्रम उद्या घेण्यात येईल

Copyright ©