Breaking News यवतमाळ

विविध महिला संघटनानी केला भिडे यांचा निषेध

प्रतिनिधी प्रवीण बोरकर

विविध महिला संघटनानी केला भिडे यांचा निषेध

आज यवतमाळ शहरांमध्ये जाहीर व्याख्यानासाठी आलेले भिडे यांनी महात्मा गांधी यांना हा महात्मा गांधीजींचा पोरगा नसून मुसलमानाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे महिलांनी आंबे खाल्ले तर पोरं होतात असं म्हणणाऱ्या भिड्याचा जाहीर निषेध करण्यासाठी अनेक महिला संघटना निराधार निराश्रित व्यक्ती विभागाच्या महिला संघटना काँग्रेसचे विविध पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून भिडेचा जाहीर निषेध केला आणि त्यानंतर सर्व पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांना अवधूतवाडी येथे अटक करण्यात आली त्यांना 2 वाजता सोडण्यात आले अशा मनुस्मृतिवाद्यांना यवतमाळ शहरांमध्ये बंदी घालायला पाहिजे होते त्यासाठी आम्ही आधी पोलीस अधीक्षक यांना विविध सामाजिक संस्थेकडून महिला अत्याचार विरोधी समितीकडून निवेदन सुद्धा दिलेले होते, सविधान दाबणाऱ्या पक्षाची सत्ता असल्यामुळे आज यवतमाळ शहरांमध्ये भिडे सारखा माणूस मनुस्मृतिवादी विचारसरणीचा माणूस यवतमाळ मध्ये येऊन शहरांमधली शांतता सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मणिपूर येथील महिलेवर झाले अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र आंदोलन चालु आहे हे दाबण्यासाठी प्रयत्न चालू आहे.प्रा मिनाक्षि सावळकर राष्ट्रीय महिला अध्यक्ष राहुल गांधी विचार मंच तथा जिल्हा अध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी व अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.तर

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी दिलेली मुलाखत ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर हा आनंद करणारी आहे त्यांनी केलेल्या राष्ट्रगृहाच्या निषेधार्थ आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ येथे त्यांच्या फलकाला फाडून त्यांचा जाहीर निषेध केला तसेच निषेध करत असताना शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे यानंतर जर संभाजी भिडे यांना अटक केली नाही किंवा त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन केले जाईल असे आव्हान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी केले आहे.

Copyright ©