यवतमाळ सामाजिक

पारवा ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांचा शहीद परिवार व महिला मंडळींच्या वतीने सत्कार.

पारवा ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांचा शहीद परिवार व महिला मंडळींच्या वतीने सत्कार.

दिनांक २७ जुलै गुरूवार रोजी पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शरद गावाजवळील वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे घाटंजी येथे शिक्षण घेणाऱ्या मुली आपापल्या गावाकडे जायला निघाल्या परंतु वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे त्या अडकून तिथे असताना त्यावेळी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी त्या मुलींची विचारपूस केली असता त्या मुलींनी आम्हाला आमच्या गावाकडे जायचे होते परंतु नदीला पूर आहे त्यामुळे आमचे जाणे होत नाही आणि परत घाटंजी ला ही जाता येत नाही असे मुलींनी सांगताच ,

क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार प्रविण लिंगाडे यांनी त्या सर्व नऊ मुलींना पारवा पोलीस स्टेशन मध्ये आणले तिथे त्यांनी सर्व मुलींची नाश्ता चहापान्याची व्यवस्था करून त्या सर्व मुलींना शासकीय वाहनाने घाटंजी ला काही मुलींना हाॅस्टेल ला तर काही मुलींना त्यांच्या रूमवर नेऊन स्वतः पोहोचविले. या सर्व कामात पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राहुल विठ्ठल राठोड यांचाही सिंहाचा वाटा आहे.

ठाणेदार प्रविण लिंगाडे व पोलीस नाईक राहुल विठ्ठल राठोड यांच्या या कार्याची दखल घेत सावळी सदोबा परिसरातील काही महिला मंडळी व कृष्णनगर येथील शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या विरपत्नी कुंतीताई आडे यांनी संयुक्तपणे दिनांक २९ जुलै शनिवार ला सावळी सदोबा पोलीस चौकी मधे जाऊन ठाणेदार प्रविण लिंगाडे व राहुल राठोड यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

विरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे यांच्यासह आयता गावातील सरपंच मंदाताई मडावी,सावळी सदोबाच्या माजी सरपंच अंजनाताई गेडाम , केळझर च्या उपसरपंच सुनिता जाधव , कापेश्वरच्या ग्रा.पं. सदस्या शशीकला पुसनाके, केळझर च्या ग्रा.पं. सदस्या काजल चव्हाण , माला माने, मंजिता शिंदे , वनिता रामटेके, निर्जला खरतडे , माधुरी गवळी ,शेख नसिम , रूखमा राठोड , सिमा बन्सोड ह्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार संदिप बारिंगे , हिंमतसिंग राठोड,शाम रायके, राहुल राठोड, गणेश राठोड हे पोलीस कर्मचारी ही यावेळी उपस्थित होते

Copyright ©