यवतमाळ सामाजिक

वारज येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत लाखोंचा गैर प्रकार

वारज येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत लाखोंचा गैर प्रकार

न केलेल्या कामावर अध्यक्ष व वन कर्मचारी आणि अधिकारी यांनी संगणमताने कामे न करताच खोटे मजूर दाखवून लाखो रुपयांचा अपाहार केला असून एकच मजूर एकाच दिवशी दोन कामावर दाखविण्यात आले त्याचे नावे रक्कम काढून स्वतः हडप करण्यात आली रकमेचा अपहार करून शासनाच्या केलेल्या फसवणुकी संबंधित अधिकाऱ्याकडे सर्व पुरावे देण्यात आले व तक्रारी करण्यात आली परंतु अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने यात अनेक वरिष्ठांचे हात गुंतले असावे असा संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे याप्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचे दिसून येत आहे व वरिष्ठ अधिकारी दोषींना वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचा प्रकार वनविभाग अंतर्गत दिसून येत आहे संयुक्त वन व्यवस्थापन समिती वारज अंतर्गत चंदन पार्क येथे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय यवतमाळ यांचे मार्फत कामे न करताच खोटे मजूर दाखविण्यात आले व या खोट्या मजुरांच्या नावे लाखो रुपये याची उचल करून संबंधित अधिकाऱ्यांनी हडप केल्याचे दिसून आले याप्रकरणी सर्व पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडे सादर केले आहे गैरप्रकार करणाऱ्या वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिव वनअधिकारी यवतमाळ यांच्यावर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व केलेला अपहार संबंधित अधिकाऱ्याकडून व अध्यक्ष कडून वसूल करण्यात यावा अशी मागणी अंकुश रामजी शेरकर वारजई संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व सदस्य यांनी केली आहे मुख्य वन संरक्षक अधिकारी यांना याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे याप्रकरणी प्रधान सचिव महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली असून लवकरच हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात येत असल्याचे तक्रार कर्त्यानी सांगितले आहे वनविभागातील होणाऱ्या संपूर्ण कामाची चौकशी करून संबधिताना निलंबित करून पूर्ण वसुली करण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे.

Copyright ©