Breaking News यवतमाळ

गतवर्षी जोडमोहावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले

गतवर्षी जोडमोहावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले

सलग दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना कळंब तालुक्यातील जोडमोहा परिसरातील शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाच; परंतु आता जमिनी पेरणी योग्यही राहिल्या नाहीत. शेतकरी किसन लीलारे, कैलास लीलारे, अनुसया लीलारे, विजय लीलारे, राजू लीलारे, घनश्याम लीलारे, बाबुलाल पवार, काशिनाथ आडे, सुभाष आडे, व ईतर शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन खरडून गेली आहे कळंब तहसीलदार शेतकऱ्यांच्या बाधावर अजूनही पंचनामा करण्या साठी आलेले नाही राळेगाव विधानसभा आमदार डॉ. अशोक उईके यांनी जोडमोहा गावाला वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शेतकऱ्या मध्ये होत आहे. जा शेतकऱ्यांच्या मतानी आमदार, खासदार, मंत्री असे अनेक पदे ही लोक्रतिनिधींनी भूषवली आहे आज त्यांच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते गेल्या ७ ते ८ वर्षा आधी जोडमोहा येथील शेकऱ्यांनी जिल्हाअधिकारी, पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी यांना नाला सरळी करण या साठी निवेदन दिले होते व त्या वाघाडी नदी चे लघुसिंचन विभागाने मोजमाप केले होते परंतु या नदी कडे कोणत्याच लोकपरतिनिधींनी लक्ष सुद्धा दिले नाही जोडमोहा वाघाडी नदी चे रुंदी करण केले नाही तर आम्ही शेतकरी तीव्र आंदोलन करणार याची शासनाने दखल घ्यावी जोडमोहा येथे झालेल्या मुसधार पावसाने जी जमीन खरडून गेली त्यांची नुकसानीची महसूल विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. कळंब तालुक्यातील गतवर्षी वार्षिक सरासरीच्या पाऊस पडला. यंदा मात्र ढगफुटी पाऊस पडला. त्यातही बुधवार २६ जु. च्या रात्रीपासून २७ जू.च्या सकाळपर्यंत जिल्हाभरात धो धो पाऊस कोसळला. या एकाच दिवसांत गत वर्षी हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झाले आहे. कळंब तालुक्यातील जोडमोहा परिसरातील येथील १० हून अधिक शेतकऱ्यांची शेतजमीनच पावसामुळे खरडली आहे. या शेतकऱ्यानी पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहेच शिवाय ही जमीन आता पेरणीसाठी योग्यही राहिली नाही. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून या नुकसानीपोटी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसाग्रस्त शेतकऱ्याच्यावतीने करण्यात येत आहे.

Copyright ©