महाराष्ट्र राजकीय

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाढदवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण

शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाढदवसानिमित्त फळ वाटप व वृक्षारोपण

शिवसेना सेलू तालुका व शिवसेना सेलू शहर तर्फे, माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात ग्रामीण रुग्णालय सेलू येथे , तसेच माहेर शांती निवास येथे फळं वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे सेलू पोलीस स्टेशन येथे वड उंबर पिपळ या सारखे अनेक प्रकारचे वृक्ष चे वृक्ष रोपण करण्यात आले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात येथील वैदयकीय अधिकारी खेडकर मॅडम, सेलू नगरपंचायत च्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, माजी पंचायत समिती उपाध्यक्ष मंजुषा पारसे, शिवसेना सेलू तालुका प्रमुख सुनील पारसे, सेलू शहर प्रमुख प्रशांत झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप तसेच येथील माहेर शांती निवास येथे बाबा लोकांना फळ वाटप करण्यात आले .येथील माहेर शांती निवास हे देणगी वर चालत असून येथील प्रमुख अतुल शेळके यांनी येतील काही बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, यावेळी सेलू नगर पंचायत चया नगराध्यक्ष स्नेहल देवतारे तथा युवतीसेना उपजिल्हा अधिकारी , माजी पंचायत समिती उप सभापती मंजुषा पारसे तालुका प्रमुख सुनील पारसे ,सेलू शहर प्रमुख प्रशांत झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यक्त केली यावेळी शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे या पक्षाकडून मदत केल्या जाहीर असे आश्वासन देण्यात आले सेलू पोलीस स्टेशन येथील पोलीस उप निरीक्षक पांडे ,यांच्या उपस्थितीत येथील स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपतालुका प्रमुख अमित बाचले , जिल्हा परिषद सर्कल प्रमुख अजय उईकें पंचायत समिती सर्कल प्रमुख भूषण सातपुते पंचायत झडशी सर्कल प्रमुख सुनील तीमांडे सेलू उप शहर पिंटू पराते ,सचिन खडतकर , शहर प्रमुख प्रकाश नौकरकर , शहर संघटक संजू भाऊ देवतारे, तालुका संघटक राजेंद्र दंडारे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©