यवतमाळ राजकीय

शहरातील अतिवृष्टी नुक्सान भरपाई मांगनी करीता आम आदमी पार्टीचा जन – आक्रोश मोर्चा

शहरातील अतिवृष्टी नुक्सान भरपाई मांगनी करीता आम आदमी पार्टीचा जन – आक्रोश मोर्चा

मागिल काही दिवसात अतिवृष्टी मुळे सम्पूर्ण यवतमाळ शहरात लोकांना त्रास सहन करावे लागले आहेत. तसेच यवतमाळ शहरात प्रभाग क्रमांक तीन येथे तलाव फ़ैल मधील नागरिकांच्या घरामध्ये तलावाचे पाणी घुसल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहेत, नागरिकांच्या घरामध्ये चार ते पाच फूट पाणी घुसून त्यांच्या घरातील घराच्या भिंती पडल्यात व घरातील अन्नधान्य वाहून गेले , औषध पाणी वाहून गेले तथा शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचे पुस्तक वह्या कपडे वाहून गेले , भांडे वाहून गेले अशा परिस्थितीमध्ये हे सर्व नागरिक संकटामध्ये सापडलेले आहेत तरीसुद्धा शासनाने त्यांना ज्या प्रमाणात मदत द्यायला पाहिजे त्या प्रमाणात मदत दिली नाही, दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ देऊन त्यांचे समाधान केले परंतु एवढ्या मोठ्या बिकट प्रसंगी शासनाने त्यांना योग्य ती आर्थिक मदत करायला पाहिजे होती पण ते आता पर्यन्त करण्यात आलेली नाहीत , त्यांना योग्य ते आर्थिक मदत शासना तर्फे मिळने करीता आज ता.२६ जुलाई, बुधवार रोजी आम आदमी पार्टी यवतमाळ शहरच्या नेतृत्वात परिसरातील शेकडो महिला व पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या व आम आदी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सोबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची मागणी केली. त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे मान्य करून त्वरित तहसीलदार साहेबांना त्याबाबतचे सर्वे करण्याचे आदेश दिले. आम आदमी पार्टीच्या वतीने पश्चिम विदर्भ नेते भाई अमन , यवतमाळ शहर अध्यक्ष गुणवंतराव इंदूरकर , तालुका अध्यक्ष शेख मोबीन, यवतमाळ जिल्हा युवा अध्यक्ष आकाश चमेड़िया, जिल्हा उपाध्यक्ष कवीश्वर पेंदोर , जिल्हा युवा सचिव शुभम मेश्राम, यवतमाळ शहर सचिव मनोहर गिरलकर, संदीप भाऊ झाडे, अविनाश धनेवार श्री नामदेव ईंगले , संजय निनावे, , रवि भोंगाड़े,नितीन भाऊ राठोड नागेश्वरजी भुते , प्रकाश भाउ डब्बावर , आशिष पाली, योगेश बास्तेवार ,शुभम चांदेकर , धनपाल नाइक, सुवना आड़े , शोभा गेडाम , मोनाली आड़े , पूजा पेंदाम , रोहिणी कुडमेथे , शकीला पठान , ज्योति मेकशाम व् अन्य कार्यकर्ते व जनता मोठे प्रमाणात उपस्थित होती .

Copyright ©