यवतमाळ सामाजिक

“किमान वेतनाच्या मागणी साठी आशा व गटप्रवर्तकांची जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक”

“किमान वेतनाच्या मागणी साठी आशा व गटप्रवर्तकांची जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक”

आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना व आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य व्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.त्यांचाच भाग म्हणून आज दिनांक २६ जुलै रोजी यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर कॉ.विजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष,आयटक व काॅ.दिवाकर नागपुरे, जिल्हा सचिव, आशा व गटप्रवर्तक संघटना यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा श्रमशक्ती भवन येथुन घोषणा व नारे देत शहर वाशीयांचे लक्ष वेधत , मोर्चा जिल्हा परिषद मार्गे , जुना बसस्टँड चौक, दत्त चौक, नेताजी मार्केट मार्गे ,शहर पोलिस स्टेशन , पाचकंदिल चौक मार्गे हनुमान आखाडा चौकातुन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयालयावर मोर्चा धडकला.. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले तसेच संघटनेच्या शिष्टमंडळाने मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देवून स्थानिक समस्या व मागण्या बाबत चर्चा केली. स्थानिक मागण्या निकाली काढण्यात येईल व राज्य लेवलवरील मागण्याचे निवेदन सरकारला पाठवून देण्यात येईल असे आश्वासन DHO यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

मागिल एप्रिल महिन्यांपासून राज्य शासना कडून मीळनारे मानधन आशा व गटप्रवर्तकांना मिळाले नाही, व मानधन नियमित पणे दिल्या जात नसुन सदर मोबदला त्वरित अदा करण्यात यावा , आरोग्य वर्धिणी अंतर्गत देण्यात येणारा टिम बेस मोबदला त्वरित अदा करण्यात यावा.आशा व गटप्रवर्तकांच्या तक्रारी बाबत जिल्हास्तरीय तक्रार समिती स्थापन करण्यात यावी.यासह जिल्हास्तरावरील अनेक मागण्या सह

महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांत ७० हजार स्वयंसेविका व ४००० गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्वाचे काम करीत असुन त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाने आयोजिलेल्या आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकुल परिस्थितीतसुदधा आशा स्वयसेविका व गटप्रवर्तक नेटाने सक्षमपणे कामे करतात…

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची नेमणूक भारतीय संविधानाच्या ४७ कलमातील पुर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरुपी आहे. म्हणून त्यांना मानसेवी मानधनी स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची पदे कायद्यानुसार निर्माण केलेली (Statutory post) पदे आहेत म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासनाचे कर्मचारी असुन केंद्र/राज्य सरकार त्यांचे मालक आहे व राष्ट्रीय आरोग्य अभियान ही आस्थापना आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाला मोबदला म्हणुन संबोधणे योग्य नाही, ते वेतन आहे. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचान्याचा दर्जा देवुन त्यांना अनुषंनिक सर्व फायदे देण्यात यावे.

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या खालीलाप्रमाणे मागण्या आहेत. त्या विनाविलंब मान्य कराव्यात. ही विनंती.

गटप्रवर्तकांच्या मागण्या :-

१) राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचान्याइतके काम करावे लागते. तरीसुदधा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचान्याप्रमाणे वेतनश्रेणी मिळत नाही. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारीत मोबदला मिळतो. तोही अत्यल्प आहे. त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो. त्यांच्या प्रपंचासाठी हातात रक्कम शिल्लक राहात नाही. या बाबीचा विचार करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी व त्यानुषंगाने मिळणारे इतर लाभ देण्यात यावेत.

२)गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करून दरमहा १५००/- रु मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.

३)गट प्रवर्तकांना डेटा एन्ट्रीकरीता प्रतिदिन रु.५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु. २५० सन २०२०-२१ च्या पीआयपीमध्ये मंजुर केल्याचे दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकादवारे आदेशीत केले आहे. परंतु सदर मोबदला गट प्रवर्तकांना दिला जात नाही. आशा सॉफटवेअर जरी सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा एप्रील २०२० पासुन प्रति महा रु. २५०/- गट प्रवर्तकांना त्वरीत अदा करण्यात यावेत.

४)गटप्रवर्तकांना वीस दिवस दौरे करुन पाच दिवस पी.एच.सी. त अहवाल तयार करावा लागतो. दुर्गम अतिदुर्गम भागात वाहनांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांना दौरे करण्यासाठी स्कुटर देण्यात यावी. गटप्रवर्तकांना दर ११ महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत.

५) गटप्रवर्तकांकडुन मोबदला नसलेली कामे लादल्या जात असुन मोबदला नसलेली कामे लादने बंद करण्यात यावे.

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या:-

१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचान्याचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत आशा स्वयसेविकांना

दरमहा १८००० रु. व गटप्रवर्तकांना २५००० रु. मानधन देण्यात यावे.

२) १० एप्रील २०२३ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात एप्रील २०२३ पासून १५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याची त्वरित प्रभावाने अंमलबजावणी करावी,

३)आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकाचे कामावर आधारीत मोबदल्याचे दर ५-६ वर्षापुर्वी ठरवलेले

आहेत. त्यानंतर महागाई दुपटी-तिपटीने वाढली परंतु त्या दरामध्ये बदल केलेला नाही. वाढलेल्या महागाईच्या

प्रमाणांत कामावर आधारीत मोबदल्याचे दर वाढवुन देण्यात यावे.

४)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दर वर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा.

५)आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी.

६). दि. २३ जुन २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी कृति समितीची बैठक झाली. सदर बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्याबाबत, त्यांच्या सेवाशर्ती ठरवण्यासाठी आरोग्य, विभाग, यशदा व कृति समिती पदाधिकारी यांची समिती गठीत करायचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

७)केंद्र निधी (पीआयपी) आणि राज्य निधी मधुन आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांचा मोबदला दिला जातो. तो एकत्रित व दरमहा नियमित पाच तारखेच्या आत देण्यात यावा.

८) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भर पगारी प्रसुती रजा सहा महिन्याकरीता देण्यात यावी. नागरी भागातील आशांचे महिला आरोग्य समिती (MAS) स्थापन नसल्यामुळे त्यांच्या मोबदल्यात कपात केली जाते. सदर समिती स्थापन करण्याची जबाबदारी ही अधिकारी वर्गाची असुन त्यांच्या हयगईमुळे आशांचे नुकसान होत आहे. तेव्हा आशांच्या मोबदल्या काटछाट करु नये.

९)आरोग्य वर्धिनी अंतर्गत थुंकी नमुना घेण्याकरीता मोबदला दिला जात नसताना सुदधा आशांना सक्तीने थुंकी नमुना घ्यायला सांगितले जाते. जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत थुंकी नमुना घेण्यासाठी आशांना सक्ती करु नये.

१०. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना विनामोबदला कामे सांगण्यात येवु नये. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना एक महिन्याची आजारी रजा देण्यात यावी.

१२) आशा स्वयंसेविकांना कडुन ABP/BPL गर्भवती मातांना समान सेवा दिली जात आहे पंरतु लाभार्थी APL धारक असल्यास आशा स्वयंसेविकांना मोबदला मिळत नाही ,तेव्हा APL/BPL ची अट रद्द करण्यात यावी.वरील प्रश्नांची सोडवणुक व्हावी, तसेच निवेदनातील मागण्या सत्वर निकाली काढव्यात याव्यात असे म्हटले आहे यावेळी कॉ.विजय ठाकरे, कॉ.दिवाकर नागपुरे, वंदना बोंडे, आशा बडेराव, अनिमीका कांबळे, रश्मी वाघ, सुहासिनी भगत, सुनीता सोनटक्के,विजया आत्राम, मालाताई इंगोले , सुनंदा कांबळे रंजना सोनोने , रंजना राउत , छाया खडककर , रवीना मुनेश्वर, मंगला रांखुडे, हर्षमाला पांडे ,

निता सोयाम ,शीतल येसेकार ,सारीका येरमे , मंगला शेळमाके , योगीता करमणकर , लक्ष्मी बोडुवार , दीपमाला ठाकरे, सीमा लिंगणवार, सुजाता पुनेकर , वर्षा कुळमेथे, रेखाताई होले , किरण कांबळे, उज्वला पाझारे, ममता क्षीरसागर , सिमा पाटील, विजया तायडे, गंगाबाई घुमे , शैला दातार, समशाद पठाण , योगीता हेमने , ज्योत्स्ना दुधे, माया इंगोले, राखी पवार, गीता जाध, शीलाताई भगत , छाया राठोड, चंचल केदार, दैवमाला खंदारे, रिना कौडुलवार , शोभा राहुल वाड, कांता खरवडे , संगीता आडे , अंजना कुरूकुटे , विजया शेखावत , शील्पा राठोड, किरण राठोड, शुंभागी सुकळकर, शालीनी ढोके, सुजाता खाडे, वर्षा वानखडे, बबिता चिंचोळे, गुंफाताई गेडाम,छबुताई इंगोले, वंदना लोणारे ,अजंना वानखडे, कविता जाधव, साधना भगत , विद्या लेंडे , छाया पाटील, सुनीता धोटे , कल्पना कांबळे, रंजना

वानखडे, सुनीता कुंभारे , ज्योती गुडेकार , वैशाली खीरटकर , लताबाई डाखोरे, सुधा मेश्राम, सुनीता, चव्हाण, वंदना वाळुकर, प्रतिभा ढोकने ,सनिता जयस्वाल यासह शेकडो आशा व गटप्रवर्तक महीला उपस्थित होत्या….

Copyright ©