यवतमाळ सामाजिक

पुसद येथे विदर्भ राज्य जन आंदोलन समितीची सभा

पुसद येथे विदर्भ राज्य जन आंदोलन समितीची सभा

पुसद येथे दि 22 जुलै 2023 रोजी विदर्भ राज्य जन आंदोलन समितीची सभा श्रीरामपूर येथील राजेश चेंदेल ह्यांचा रामकृषण हाईट्स येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार वामनराव चटप साहेब ह्यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. सदर सभेमध्ये दि 9 ऑगेस्ट 2023 रोजी नागपूर येथे वीज मंत्री तथा उपमुखमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी वीज वाढ कमी करण्यासाठी घेराव घालण्यात येणार आहे त्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.तसेच ह्या सभेमध्ये शेंबालपिप्री येथील देव गव्हाण येथील नागरिक ह्यांनी आपल्या गावातील समस्या मांडल्या देव गव्हाण येथील जवळपास गावठाण मधील 50 % भाग हा पाण्या खाली गेला आहे आणि उर्वरित भाग हा कधीही पाण्या खाली जाऊ शकते.देवगव्हण गावाची जमीन ही काळी मातीची आहे त्यामुळे इसापूर धरण मधील पाण्याची पातळी वाढली तर भविष्यात हे गाव पाण्या मध्ये जाण्याचे शक्यता आहे असे गावकरी मंडळी ह्यांना वाटते असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी निवेदन सुद्धा दिले आहे.

तसेच नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तालुका उपाध्क्षपदासाठी जयानंद उबाळे, सचिव म्हणून शंतीसागर इंगोले, कार्यध्यक्ष महणून राजेश चेंदेल , शहर अध्यक्ष म्हणून सन्नी पांडे ह्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र मा वामनराव चटप साहेब ह्यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर सभेला यवतमाळ जिल्हा अध्यक्ष कृष्णराव भोगडे,जिल्हा उपाध्यक्ष मधुसूदन कोवे,अविनाश पोलकट, संभाजी टेटर, रामकृष्ण चेंदेल ह्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम चे प्रास्तविक सुनील गुध्दटवार ह्यांनी केले.

Copyright ©