Breaking News यवतमाळ

मोझर येथे खचलेल्या विहिरीत पोत्यात आढळला कुजलेला मृतदेह

लाडखेड प्रतिनिधी

मोझर येथे खचलेल्या विहिरीत पोत्यात आढळला कुजलेला मृतदेह

मोझर शिवारात घटनेने खळबळ हत्या कि आत्महत्या

दारव्हा तालुक्यातील मोझर येथे पोत्यात बांधून असलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली या घटनेने खळबळ उडाली असून लाडखेड पोलिसांना सोमवारी सायंकाळी मोझर शिवारात खचलेल्या विहिरीत मृतदेह असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना विहिरीत पोत्यात काहीतरी बांधून असल्याचे आढळून आले पोलिसांनी पोते बाहेर काढले असता त्यात कुजलेल्या अवस्थेतील एक मृत देह आढळला मृतदेह नेमका कुणाचा या बद्दल खात्री पडू शकले नाही मृताच्या एका दंडावर एका देवतेचे तर हातावर शंकर निकिता लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे मृतदेह पुरुषाचा असावा याचा कयास पोलिसांनी वर्तविला सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे त्यामुळे हा अपघात की खून असा प्रश्न निर्माण झाला आहे अजून पर्यंत या संदर्भात लाडखेड पोलिसांना कोणताही सुगाव लागला नसल्याने येथील ठाणेदार स्वप्निल निराळे हे या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून कसून चौकशी करीत आहे

Copyright ©