यवतमाळ सामाजिक

डॉ. अंजली गवार्ले यांनी जाणल्या पुरग्रस्तांच्या समस्या नव्‍या जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीचे आश्वासन

डॉ. अंजली गवार्ले यांनी जाणल्या पुरग्रस्तांच्या समस्या नव्‍या जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीचे आश्वासन

यवतमाळ : गेल्या दोन ते तिन दिवसात निसर्ग संकटापुढे मानव हतबल झाले होते. पुरग्रस्तांपुढे जिवन जगण-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत पुरग्रस्तांचे जिवन सुरळीत करण्यासाठी धडपड केली. याशिवाय येथील प्रसिध्द डॉ. अंजली गवार्ले यांनी पुरग्रस्तांची दोन दिवसांपासून आरोग्य तपासणी करीत विविध वस्तु देत त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. अशा सामाजिक कार्याचा आदर्श समाजाने घेण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याला माणूसकीचा लाखमोलाचा सलाम.

डॉ. अंजली गवार्ले यानी शिवालय तसेच हरीतवाल यवतमाळ येथिल पुर पीड़ीतांची आरोग्य तपासनी केली तसेच औषधी वितरण केले. तसेच वर्षा चौधरी व प्रवीना ढोले आरोग्यसेविका श्रेया इंगळे,यानी पुर पीड़िताना साबुन ,सैनिटरी पैड्स ,कपड़े तसेच स्त्रियांचे समानाचे वाटप केले. पुर पीड़ितलोकांची पाहनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यानी सर्वांना मदतीचे आश्वासन दिले, तसेच डॉ .अंजली यानी पुरग्रस्ताना, क्षतिग्रस्ताना ड्रेसिंगसाठी क्रीम आय, ईयर ड्रॉप्स, फिव्हर पोटदुखी टैब,तसेच फस्ट एड कीट वितरण केले, तसेच वैयक्तिक स्व्छतेबद्दल माहिती दिली, तसेच जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्तांची. अन्नाची , पाणी , शौचालय, या सर्वांची जातीने पाहनी केली.

यावेळी तहसीलदार डॉ योगेश देशमुख,यांनी कमी कालावधीत जिल्हाभर प्रशासनाकडून आरोग्य सेवेची सर्वत्र पूर्तता करत आहे असे कळविले, तालुका आरोगयाधिकारी क्रांती नवांदिकर, डॉ विजय अग्रवाल , नारी रक्षा समितीचे अध्यक्ष विनोद दोंदल, चेतना राऊत,

योगिता मिसाळ, यावेळी उपस्थित होते.

Copyright ©