यवतमाळ राजकीय

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या- जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या- जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड

जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. यवतमाळ शुक्रवार २१ जुलै मध्यरात्री ते शनिवारी २२ पाहाटे पासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरा मुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे नुक्तेच पेरलेली पिके वाहून गेली अनेकांची घरे या पुरात वाहून गेली या घटनेमुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले असून अनेक संसार उघड्यावर आले आहे यासंदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना व नागरीकांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करावे तसेच. बाधीत शेतकऱ्यांना हेक्टरी रु.५० हजार ची मदत तात्काळ जाहिर करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हासंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे तसेच ग्रामिण व शहरी भागातील घराची पडझड झालेल्या नागरीकांना तातडीची धान्याची व रोख रकमेची मदत देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देते वेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख प्रविण शिंदे. संतोष ढवळे, संजय दरेकर उपाध्यक्ष मध्यवर्ती बँक, उपजिल्हा प्रमुख, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे, युवासेना जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर , रुपेश सावरकर, गणेश चांदेकर, संतोष राठोड, कृष्णा निंबर्ते उपस्थित होते.

Copyright ©