यवतमाळ सामाजिक

शासनाने पुरग्रस्तांना तातडीने मदत करावी जि.प.माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांची मागणी

शासनाने पुरग्रस्तांना तातडीने मदत करावी जि.प.माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांची मागणी

दोन दिवसांपूर्वी पैनगंगा,अरूणावती,अडाण या नदयांना आलेल्या महापूराने आर्णी तालुक्यातील खडका, कवठा ( बू.),आयता, जलांद्री, कापेश्वर, चिमटा , झापरवाडी, वरूड ( तू.),दातोडी ,गुढा, थड ,पळशी, शिवरतांडा, बेलोरा,बिलायता येथे नदीला आलेल्या महापूराने नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली तर काही शेती पूर्णतः खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

तसेच नदी व नाल्या काठावरील अनेकांच्या घरात पूराचे पाणी शीरल्याने घरांची पडझड झाली तर काही घरे जमिनदोस्त झालेली आहे.

तसेच गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, शेतातील पिके सततच्या पावसामुळे पिवळी पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे,

अशा परिस्थितीत शासनाने विनाविलंब, शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना शासकीय मदत करावी अशा आशयाचे निवेदन यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिनांक २४ जुलै सोमवार ला मा‌. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचेकडे दिले आहे.

सावळी सदोबा सर्कलमध्ये सततच्या पावसामुळे मुळे व नदी नाल्याच्या महापूराने संपूर्ण पिके नष्ट झाली आहे.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनामार्फत तमाम शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे नाहीतर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांना दुसरा पर्याय उरणार नाही, तेव्हा सर्व शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत द्यावी अशी मागणी मुबारक तंवर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Copyright ©