Breaking News यवतमाळ

दहा एकरात पाणीच पाणी !

दारव्हा/प्रतिनिधी चेतन पवार

दहा एकरात पाणीच पाणी !

सरकार जगु की मरु ! देवेंद्र जगदीश भगत पाथ्रड देवी या शेतकऱ्याचा टाहो.

दारव्हा. तालुक्यापासून पाथ्रड देवी हे गाव २५ किमी जवळ असून येथील शेतकरी, देवेंद्र जगदीश भगत यांच्या शेत सर्वे १३/१ ड, १४/१, शिवार निंभाळा मधील जवळपास १० एकर जमिनीमध्ये, अतिवृष्टीच्या पावसाने संपूर्ण पाणीच पाणी झाले. यामुळे संपूर्ण पीक खरडून गेले असून, सदर शेतकरी कुटुंबाची जगण्याची आशाच माळवली आहे. पाथ्रड देवी गोकी प्रकल्प ओर फ्लो झाल्याने वाहणाऱ्या नाल्याच्या शेजारी त्यांचे शेत असून, त्या नाल्याच्या महापुराच्या कचाट्यात यांचे शेत अडकले. आणि त्यांच्या जवळपास संपूर्ण जमिनीवर पाण्याने ताबा घेतला. कसंतरी पीक फुललं होतं म्हणून शेतकरी राजा समाधानी होता. पण अतिवृष्टीने दहा एकरात पाणी झाल्यामुळे, आम्ही जगाव की मरावं? असा सवाल देवेंद्र जगदीश भगत करीत आहेत. सरकारने आमच्या दुःखाची जाणीव समजुन घेऊन, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. पंचनामे कधी होणार? सर्वे कधी होणार? आणि नुकसान भरपाई कधी भेटणार? खरंच शासन व प्रशासन तातडीने त्यांना मदत करणार का?अवघ्या दोनच दिवसात, उभं पीक होत्याचं नव्हतं झालं. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गोरगरीब शेतकरी दरवर्षी सहन करतो. खरंच सरकारने तातडीने अशा शेतकऱ्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करताना दिसत आहेत.

Copyright ©