यवतमाळ सामाजिक

मानवी जीवनासाठी पर्यावरण व सृष्टी संवर्धन महत्वाचे.- ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

मानवी जीवनासाठी पर्यावरण व सृष्टी संवर्धन महत्वाचे.- ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

माझी वसुंधरा अभियानातंर्गत ग्रामपंचायत तेंडोळी येथे वृक्षारोपण.

सृष्टी संवर्धनाकरिता वृक्ष लागवड करून तिचे पूर्णता संगोपन करण्याची गरज आहे केवळ वृक्ष लागवड करून भागणार नाही तर त्या वृक्षास जीव लावून आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्याला जपले पाहिजे. आपल्या घराच्या अंगणात, शेतात वृक्षाची लागवड केली पाहिजे अन्यथा पर्यावरण व सृष्टी अभावी आपणास मानवी जीवनास मुकावे लागेल तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन या माझी वसुंधरा अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामपंचायत तेंडोळीचे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले ते ग्रामपंचायत द्वारा आयोजित माझी वसुंधरा अभियान 0.4 च्या निमित्ताने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सपना रविशंकर राठोड होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णीचे उपसभापती परशरामजी राठोड, सेवानिवृत्त तलाठी वसंता जाधव, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, विकासगंगा तथा रिलायन्स फाउंडेशन चे समन्वयक संदीप घोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी “माझी वसुंधरा” हे अभियान महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहे.

पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी “माझी वसुंधरा (माय अर्थ)” हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतला आहे. हा उपक्रम निसर्गाच्या “पंचमहाभूते” नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरूक करून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रती तसेच राज्याच्या शाश्वत विकासाप्रती प्रयत्न केले जात आहेत. तेव्हा या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत जाधव यांनी सूत्रसंचालन शिवानी शेलोटे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप घोडे यांनी केले

या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व सदस्य यांच्यासह आयसीआरपी ज्योतीताई निंबाळकर, वर्षा निंबाळकर, शारदा निकुरे, अंगणवाडी सेविका ज्योती बोरघरे, मायाताई निकुरे, आरोग्य विभागाच्या डॉ. सुप्रिया राठोड, सिस्टर एन. टी. उके, आरोग्य सेविका वर्षा तेलंगे, शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक निर्मलचंद तिवारी, महादेव शेलोटे, शिवाजी कोलते, रविशंकर राठोड व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©