यवतमाळ सामाजिक

यवतमाल का राजा व केदारेश्‍वर देवस्थान व तालुका प्रशासनाच्या वतीने पुरग्रस्तांना धान्य किटचे वितरण

यवतमाल का राजा व केदारेश्‍वर देवस्थान व तालुका प्रशासनाच्या वतीने पुरग्रस्तांना धान्य किटचे वितरण

पुरामुळे झालेले ग्रामीण व शहरी भागातील नुकसान लवकरच भरुन काढणार : आ. मदन येरावार

यवतमाळ – मागील दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर झाला असून अनेकांची संसार उघड्यावर आले आहेत. या बाबीची गांभीर्याने दखल घेत यवतमाळचे लोकप्रित आमदार मदन येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन, सेवाकार्यात सदैव अग्रेसर यवतमाल का राजा सेवा परिवार नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळ व केदारेश्‍वर देवस्थान संस्थान (महादेव मंदिर) यवतमाळच्या वतीने आज यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली, रामनगर, आकपुरी, वडगांव जंगल, किटा कापरा सह शहरातील तलाव फैल, वंजारी फैल परिसरातील शेकडो पुरग्रस्तांना आ. मदन येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य किटचे वितरण तालुका प्रशासन, यवतमाल का राजा सेवा परिवार व केदारेश्‍वर देवस्थानच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांशी वार्तालाभ करतांना आ. मदन येरावार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान रस्त्यांची समस्या, पुल, सुरक्षा भिंती, आदि समस्यांचे युध्द स्तरावर सोडविण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल.

असे अभिवचन पुरग्रस्तांना देवून गावाचा व शहराचे जे नुकसान झाले ते भरुन काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी यवतमाल का राजा सेवापरिवाराचे सदस्य, भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी तसेच केदारेश्‍वर देवस्थानाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©