महाराष्ट्र सामाजिक

आपली पिढी वाचविण्यासाठी जनसुनावणीत सहभागी व्हा

देवळी प्रतिनिधी सागर झोरे 

आपली पिढी वाचविण्यासाठी जनसुनावणीत सहभागी व्हा.

युवा संघर्ष मोर्चाचे नागरिकांना आवाहन.

एसएमडब्लू इस्पात च्या प्रकल्पाची पर्यावरण विषयक लोकसुनावणी २७ ला.

देवळी शहरा सह परिसरातील अनेक गाव महालक्ष्मी स्टील कंपनीच्या धुरामुळे त्रस्त आहे. परंतु या जीवघेण्या प्रदूषणाविरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नसल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. अनेक जण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असतात. देवळी शहरातील नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रदूषणाविरुद्ध लढा देत आहे. महालक्ष्मी कंपनीच्या या विषारी प्रदूषणामुळे देवळी शहर व परिसरातील पाचगाव, सेलसुरा, पडेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दिघी, बोपापुर, डीगडोह, इसापूर व इतर गावातील नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. सध्या या भागातील नागरिकांचे डोळ्यांचे आजार, त्वचारोग, दमा, अस्थमा यांमध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे तज्ञ डॉक्टर सांगतात. यासोबतच कंपनीच्या याच प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात सुध्दा बरीच घट झाल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. असे असतांना आता ही कंपनी आर्यन ओर पेलेट सोबत कोल गॅसिफायर स्पॉंज आर्यन प्लांट व कंपनी करिता स्वतःचा कोळशापासून विज तयार करण्याचा थर्मल पॉवर प्लांट सुरू करीत आहे व या प्लँट मधून सध्या सुरू असलेल्या प्लांट पेक्षा चार पट प्रदूषण होणार असल्याची माहिती प्रदूषण विरुद्ध लढा लढणाऱ्या संस्था द्वारे दिली जात आहे. त्यावेळी गंभीर परिस्थिती राहील व या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नविन प्लँट सुरू करण्यापूर्वी त्याबाबत ‘पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी’ प्रदूषण नियंत्रण मंडळ घेत असते. अशावेळी नागरिक गंभीरपणे विचार करीत नाही, या शासकीय लोकसूनावणीकडे नागरिक दुर्लक्ष करतात व नंतर प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यावर नागरिकांकडून विरोध केल्या जातो. परंतु त्यावेळी केलेल्या विरोधाला काहीही अर्थ नसतो. मात्र आता देवळीकर नागरिकांनी, यावेळी तुम्ही गाफील न राहता. येत्या २७ जुलै रोज गुरुवार ला दुपारी १२.३० वाजता ‘आर्यन ओर पेलेट सोबत कोल गॅसिफायर स्पॉंज आर्यन प्लांट व कंपनी करिता स्वतःचा कोळशापासून विज तयार करण्याचा थर्मल पॉवर प्लांट’ ची पर्यावरण विषयक लोकसुनावणी होणार आहे व परिसरातील प्रत्येक नागरिकाला या लोकसुनावणीत उपस्थित राहून आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. या जनसुनावणीची प्रत्येक नागरिकाला माहिती होईल अशी जाहीरात करणे बंधनकारक आहे मात्र कंपनी व कंपनीशी मिलीभगत असलेले नेते अशी जाहिरात करीत नाही किंवा होवू देत नाही. महा’लक्ष्मी’ च्या कृपेने कंपनी त्यांच्या मर्जीतील लोक या जनसुनावणीला पाठवून कंपनीच्या फायद्याचे बोलायला लावतात व स्थानिकांच्या रोजगाराचा भावनिक मुद्दा पुढे करतात.युवा संघर्ष मोर्चाचा कुठल्याही कंपनीला विरोध असण्याचे कारण नाही व स्थानिकांच्या रोजगाराला तर मुळीच नाही. परंतु या कंपनीने किती स्थानिकांना रोजगार दिला व किती परप्रांतीयांना ? याचीही आकडेवारी तपासली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली आहे. देवळीकरांनी या लोकसूनवणीत येऊन प्रदूषणाचा जनजीवनावर व पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामा बाबत मत मांडण्याचे आवाहन युवा संघर्ष मोर्चाच्या केले आहे.

सध्या देवळी MIDC मध्ये सुद्धा असे अनेक उद्योग आहेत त्यांच्याविरुद्ध देवळीकरांनी कधीच आवाज उठवलेला नाही. परंतु प्रचंड प्रदूषण निर्माण करणारे कारखाने देवळीकरांच्या माथी का ? असा सवाल नागरिक करीत आहे.

Copyright ©