यवतमाळ सामाजिक

मुसळधार पावसाने तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी

मुसळधार पावसाने तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान

प्रशासकीय यंत्रणा सुस्त;घरांची पडझड

अधिवेशनात नुकसान भरपाई जाहीर करावी

दारव्हा तालुक्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने शेती व शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील घराची पडझळणी होऊन शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. आठवडाभरापासून सतत पावसाचा धक्का सुरू असताना शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचलेला असल्याने पिके संकटात सापडली असताना आता कालपासूनच्या पावसाने कहरच केली आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरांची पडझळी झाली आहे. लहान मोठे नाल्यांनी रुद्र रूप धारण केल्याने या नदी नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भात पावसाळी अधिवेशनात शासनाने भरीव निधी जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा दिलासा देण्याची भावना श्याम राठोड (उपसरपंच ) जगदीश चव्हाण,यांच्या वतीने शयांनी व्यक्त केली आहे  मागील दोन तपासून निसर्ग कोपल्याने निसर्गाच्या प्रकोपात शेतकरी पार भरडल्या जात असून शेतीत बी बियाण्याचे पैसे आता फेडावे तरी कसे अशा चिंताचूर परिस्थितीत शेतकरी पावसाळी अधिवेशनाकडे आस लावून बसलेला आहे. तेव्हा या दुष्काळ दृश्य परिस्थिती शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदतीची हात देण्याची अपेक्षा श्याम राठोड जगदीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात नदीच्या काठावरचे बोरिअरब ,सावळा तरणोली , महागाव, चिखली तळेगाव , रामगाव रामेश्वर खूप गाव पिंपळखुटा,इरथळ, लाख खिंड टोकावर असणाऱ्या दारव्हा तालुक्यातील गावाला वेड घातलेल्या पूस नदी फुटल्याने येथील घराची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याने घरात असलेले साहित्यही भिजले आहे.खरडून गेलेल्या शेतीत कशी बशी पेरणी केलेले बियाणे अंकुरले असताना आता या अंदाजून पावसात तेही पीक गेल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू शासन पुशील का?

असा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे . दिनांक २१ व २२ जुलै मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे श्याम राठोड , जगदीश चव्हाण यांनी दिली यांनी केली आहे, यावेळी उपस्थित श्याम राठोड (उपसरपंच) जगदीश चव्हाण ,(सदस्य) विजय जाधव ,मंगेश पाटे पंडित चव्हाण ,निलेश इंगोले ,दिनेश दायमा, विनोद आडे , उदल चव्हाण ,लखन राठोड ,अनिल पवार ,हे सर्व शेतकरी उपस्थित होते

Copyright ©