यवतमाळ सामाजिक

अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी गवळी समाज संघटनेची मागणी

अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी गवळी समाज संघटनेची मागणी

21 जुलै २०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली यावेळी तीनशे मिलिमीटर च्या वर पाऊस पडल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व गवळी समाजाचे नुकसान झाले आहे या पावसामुळे काहींचे जनावरे वाहून गेली तर काहींची घरातील अन्नधान्य पैसा महत्त्वाची कागदपत्रे नीकामी झाली अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले त्यामध्ये संसार उपयोगी वस्तू नीकामी झाल्या अनेक संसार उध्वस्त झाले ही बाब सर्वश्रुत असताना यवतमाळ नगर परिषदेतील वडगाव रोड, लोहारा, उमरसरा तसेच इचोरी जामवाडी तथा जवळा घटना या भागातील गवळी समाजातील दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले यात अनेकांचे जनावराला आणलेले वैरण वाहून गेले अनेकांच्या घरात ठेवून असलेले ढेप सरकी वाहून गेली त्यामुळे शासनाने शक्य तितक्या लवकर दखल घेऊन पंचनामे करावे व विशेष करून दूध उत्पादक गवळी समाजाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरीत सानुग्रह निधी देण्यात यावी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशोकराव भाले यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चावरे जिल्हा सचिव दीपक लंगोटे अविनाश श्रीरग लंगोटे सुरेखा लंगोटे व ओकार चेके यावेळी उपस्थित होते

Copyright ©