यवतमाळ सामाजिक

तो पुल होइल तरी कधी,बोरखेडि येथील शेतकरयानचा प्रशासनाला सवाल

आकोली प्रतिनिधी सचिन चावरे 

तो पुल होइल तरी कधी,बोरखेडि येथील शेतकरयानचा प्रशासनाला सवाल

गत तिन वर्षापासून शासन दरबारी उंबरठे झीजऊन फायदा नाही.शेतकर्यानचा प्रषासनावीरोधी रोष

दरवर्षीच तब्बल 30ते 35शेतकरयानचा रस्ता होतो बन्द.

आर्वि तालुक्यातील बोरखेडि हे तालुक्याच्या शेवटल्या टोकाला असुन येथील विकास कामावर प्रशाषनाचे पुरेपुर दुर्लक्ष होत असल्याचा अरोप येथील ग्रामस्थ व शेतकरी करित आहे

मागिल तिन वर्षापासुन परिसरात पावसांनी कहर केल्यामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गत तिन वर्षाआधी पाऊस जास्त झाल्यामुळे बोरखेडीचे धरण ओहर फ्लो झाले होते ओहर फ्लो च्या कालव्यात पानी साठा जास्त असल्यामूळे बोरखेडी शेत शिवारात जाण्याचा मुख्य रस्त्यावरील पुल वाहुन गेला होता व काही शेतात पानी शिरले होते व उभ्या पिकाचे ही नुकसांन झाले होते मात्र या बाबत प्रषासनाकडे वारंनवार पुल दुरुस्तीची मागणी करुन यावर दुर्लक्ष करित आहे असे शेतकरयानकडून सांगण्यात येत आहे.पर्यायी ये जा करण्यासाठी दुसरा रस्ताच नसल्यामुळे सलग दोन वेळा शेतकरयानी पैसे गोळा करुन स्व खर्चानी तात्पुरत्या पुलाची उभारणी केली होती.परिणामी पावसाळ्यात या रस्त्यावरुन मोट्या प्रमाणात पानी वाहते व अवागमनच बन्द होते व शेतकरयानपुढे शेती कशी करायची मोठा गहन प्रश्ण उभा होतो व शेतात जाणार्या शेतकरया नचि मोठी अडचण तयार होते या संदर्भात देशोन्नती ने आधी वृत्तांकन ही केले होते, दरम्यान बोरखेडी येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, पाटबंधारे विभाग तहसीलदार ते जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आमदार, खासदार ते मुख्यमंत्र्यापर्यंत पत्राद्वारे या पुल बांधण्याच्या निधीची मागणी केली मात्र चार वर्षे लोटूनही पूलाला अद्याप पर्यंत निधी मिळालेला नाही व कुठलीही मदत मिळालेली नाही असे बोरखेडी येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे व अनेकदा फुल ओलांडून जाताना शेतकऱ्यांना घसरून पडून किरकोळ दुखापती झाल्या असेही बोरखेडी येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बोरखेडी येथील शेतकरयानची प्रतिक्रीया जाणुन घेतली असता,तालुक्याच्या शेवटच्या टोकावर गाव असल्यामूळे विकासकामावर लोकप्रतिनिधीचे नियमितच दुर्लक्ष होत असते, धरण ओहरर्फ्लो झाले की दरवर्षीच तयार केलेला कच्चा पुल वाहुन जात असतो व जीव धोक्यात टाकुन त्या रस्त्यावरुन अवागमन कराव लागते या वेळेस पुलाचे काम न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया पुढे धरणे अंधोलन करु.

Copyright ©