महाराष्ट्र सामाजिक

पावसाळ्यात देवळी एम.आय.डीसी चे रस्ते झाले चिखलमय

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

पावसाळ्यात देवळी एम.आय.डीसी चे रस्ते झाले चिखलमय

एम आय डी सी कंपन्यांचा सी एस आर फंड जातो कुठे

या खड्डेमय चिखल युक्त रस्त्याला जबाबदार कोण

या खड्डेमय चिखल युक्त अनेक मजूर झाले जखमी

सध्या देवळी शहरात पावसाने जोर पकडला आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे देवळी एम आय डी सी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा अत्यंत दैनिय झालेली आहे.चोहीकडे रस्त्यांवर खड्डे व चिखल पसरलेला आहे त्यामुळे एम आय डी सी मध्ये येणारे जाणारे मोठमोठे वाहन तसेच एम आय डी सी मध्ये काम करणारे मजूर वर्गाला फार असहनिय त्रास सहन करावा लागत आहे.

एस एम डब्ल्यू ई स्पात या कंपनीच्या समोरील रस्त्यावर खड्डे व चिखल याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्यामुळे एमआयडीसी परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे या खड्डे मय चिखलामुळे अनेक मजुरांच्या वाहनांना अपघात होऊन जखमी झालेले आहे तरीही त्या परिसरातील कंपन्या याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. एमआयडीसी कंपन्यांचा सी एस आर फंड हा वार्षिक कोटीच्या घरात असतो परंतु सी एस आर फंडाचा नेमका उपयोग कुठे होतो हे या परिसरातील कंपन्या दाखवतच नाही एमआयडीसी परिसरातील रस्त्यावरील व विद्युत लाईटसाठी वापरता येतो परंतु हे कंपन्या हे सी एस आर फंड लोकहितासाठी वापरण्यास टाळाटाळ का करीत आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे शासनाने या एमआयडीसी रस्त्याचे खड्डेयुक्त चिखलमय रस्त्याचे बांधकामाकडे लक्ष देऊन त्वरित एमआयडीसीतील रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी एमआयडीसीत काम करणारे नागरिक करीत आहेत.तसेच सी एस आर फंडाचा गभाड करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी अशी विनंती त्या परिसरातील नागरिक करीत आहे.

Copyright ©