यवतमाळ सामाजिक

वादग्रस्त ठाणेदार राणे यांची अखेर बदली

देवळी प्रतिनिधी सागर झोरे 

वादग्रस्त ठाणेदार राणे यांची अखेर बदली

देवळी शहरात ठाणेदार राणे यांच्या काळात अवैध धंद्यांना आला होता ऊत

ठाणेदार राणे यांनी अनेकांवर केले होते आकाशापोटी खोटे गुन्हे दाखल

देवळीत ठाणेदार राणेंना लाभला होता राजकीय आश्रय

ठाणेदार राणे यांच्या काळात देवळीतील कायदा व सुव्यवस्था आली होती धोक्यात

देवळीतील वादग्रस्त ठाणेदार तिरुपती राणे यांची अखेर पोलीस अधीक्षक वर्धा जिल्हा यांच्या आदेशावरून उचल बांगडी करण्यात आली आहे यांच्या ठिकाणी देवळी शहरात आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर हे पदभार सांभाळणार आहे.  देवळी शहरात ठाणेदार राणे यांनी जवळपास अडीच वर्ष देवळी पोलीस स्टेशनचा कारभार पाहिला यांच्या काळामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला होता खुलेआम अवैध धंदे सुरू होते त्यांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा जीव सुद्धा गमवावा लागला होता देवळीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती तेव्हा शहरातील काही सामाजिक संघटनांनी तसेच शहरातील पत्रकारांनी ठाणेदार राणे ला जाग आणण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन कायदा व सुव्यवस्था विषयी चिंता व्यक्त केली तर पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठाणेदार राणेंना धारेवर धरले होते या गोंधळलेल्या स्थितीमध्ये ठाणेदार राणे यांनी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पत्रकारांवर आकाशापोटी खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना खोटे गुन्ह्यामध्ये फसवून जीवेस मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या होत्या,त्यामुळे शहरात एकच संतापाची लाट उसळली होती, ठाणेदाराच्या विरोधात पत्रकारांवर व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी तीव्र निषेध करत पोलीस अधीक्षकांना अनेक तक्रारी दिल्या होत्या त्यावर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले होते,परंतु त्या चौकशीचे काय झाले ते आज पर्यंत कळलेच नाही ठाणेदार तिरुपती राणे यांची वागणूक ठाणेदार पदास शोभेल अशी नव्हती,ते आपल्या सहकारी पोलिसांना देखील शिवीगाळ करून खालच्या दर्जाची वागणूक देत होते त्यांनी देवळी पोलीस स्टेशन मधल्या एका पोलीस उपनिरीक्षका सोबत झालेल्या शिवीगाळाचा वाद चांगलाच गाजला होता शेवटी तो संतापलेला पोलीस उपनिरीक्षक एका महिन्याची रजा घेऊन घरी बसला होता. त्यांची ही देवळी शहरात वादग्रस्त प्रतिमा निर्माण झालेली होती देवळीतील काही मोठ्या राजकारनी पुढाऱ्यांना हाताशी धरून ठेवले होते त्यामुळे त्यांना देवळीत राजकीय छत्रछाया लाभली होती त्यामुळे ते मनात आले तसे वागत होते पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार राणे यांची उचल बांगडी केल्यामुळे देवळीतील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे आता हे सेलू पोलीस स्टेशन मध्ये कोणते कारणामे करतात याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे.

Copyright ©