यवतमाळ सामाजिक

बोधेगाव परिसरात शेकडो शेत कऱ्यांच्या शेतातील पिक गेले वाहून

बोदेगाव प्रतिनिधी राम चव्हाण

बोधेगाव परिसरात शेकडो शेत कऱ्यांच्या शेतातील पिक गेले वाहून

मुसळधार पावसाने अनेक गावाला फटका यात रामगाव( रामेश्वर )येथील अडान नदी आणि सर्व नाल्यांना पूर आल्यामुळे घर व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दारव्हा ते कारंजा रोड बोधेगाव लगतच पूलाला पूर आल्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरले यात पृथ्वीराज भगुलसिंग चव्हाण यांच्या शेतातील भाजीपाला पूर्णतः वाहून गेला यामध्ये वांगे मिरची टमाटर पालक इत्यादीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले तर गोविंदराव सखाराम जाधव ज्ञानेश्वर मोतीराम जाधव, दिलीप मोतीराम जाधव, अवधूत गोविंदराव जाधव, जयसिंग परसराम चव्हाण, भवन लोगो चव्हाण, हंसराज गोविंदराव खंडारे, अमोल वसंतराव पाटील, सुनील गोविंदराव चव्हाण, सुभाष राठोड, श्याम रमेश काळे राजू शामराव दहापुते व अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बोदेगाव येथे मुसळधार पाऊस चालू असताना दारव्हा तहसील चे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी तलाठी यांनी बोधेगाव परिसराची पाहणी केली व रस्त्याने येत असलेल्या अनेक वाहने अडवून स्वतःचे वाहन रस्त्यावर लावून सर्वसामान्य सुरक्षा देण्याचे काम केले या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदार झालेला आहे,अनेकांचे घर पडले तर काहींच्या भिंती पडल्या याची शासनाने त्वरित दखल घेऊन परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेने तातडीने मदत देण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे

Copyright ©