Breaking News यवतमाळ

अकोला बाजार येथे पावसाचा कहर ,अनेक घरात पाणीच पाणी

अकोला बाजार येथे पावसाचा कहर ,अनेक घरात पाणीच पाणी

काल पासुन जिल्हय़ात सतत धार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला होता.या सततधार पावसामुळे आज अकोला बाजार येथील नदीला पूर आला आणि नदीच्या पाच ठिकाणी बांध फुटून पुराचे पाणी गावांत शिरल्याने नागरिकांचा एकच हाहाकार उडाला. येथील वॉर्ड क्रमांक 2 व 4 मधील लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले,तर मंदिर,शाळेत सुद्धा,सर्व पूर बाधित लोकांना सुरक्षेतेसाठी ग्राम पंचायत मध्ये आसरा दिला. या पूरांमुळे अनेकांची घरे पडझड झाली तर काहींच्या घरात पाणी शिरले. या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यवतमाळ रोड वरील डांबरी रस्ता उखडून जाऊन बाजूला तीन ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडले सर्व वाहतुक खोळंबली होती. गावातली स्वयंसेवकांनी या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी धावपळ करीत मदतीचा धीर दिला.सर्व पूरग्रस्त नागरिकांना खिचडीचे वाटप करत,काही धान्य वाटप करून त्यांचे थोडेफार अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला गेला.मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामविकास अधिकारी सरपंच,उपसरपंच व गावांतील तरुण मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा हिरीरीने सर्वांची मदत करण्यासाठी धावत होते. या पूरांमुळे खैरगाव, मांजर्डा, सालोड,हातगाव, येवती या गावांचा संपर्क तुटला. अशीच परिस्थिती सन 2012 या वर्षात घडली होती आणि योगायोग हा 22 जुलैच होता.

Copyright ©