Breaking News यवतमाळ

मुसळधार पावसाने शेतकरी हतबल,शेकडो हेक्टर वरील पिके झाले निकामी

मुसळधार पावसाने शेतकरी हतबल,शेकडो हेक्टर वरील पिके झाले निकामी

कळंब तालुक्या अंतर्गत शेळी खोरद खुर्द मंडळातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर पाण्याचा कहर झाल्याने नाल्या काठावरी जमिनी तर खरडून गेल्या इतर ठिकाणच्या जमिनीतील पाणी साचले,तर शेताच्या बाजूने असलेली यवतमाळ नदी पात्र भरगच्च भरून वाहत होती त्या मधील पाणी शेतात पिके वाहून नेली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर्वच शेतात टाकण्यास आलेले बांध फुटल्याने ते पाणी शेतामधून वाहून निघाले जेम तेम कशाबशा पेरण्या आटोपल्या अनेकांचे पिक नुकतेच वर आले आणि या मुसळधार पावसाने चक्क पिके मातीमोल केल्याने पुरता शेतकरी हतबल झाला आहे.पुन्हा पेरणी करणे तर शेतकऱ्यांना शक्य नाही आणि शासनाची तुटपुंजी मदत शेतकऱ्याला तारू शकत नाही कारण शेतीची मशागत,पेरणी,खत,फवारणी मजुरी यातच असलेनसले पैसे लाऊन पिकाची जोपासना केली अन् मुसळधार पावसाने सर्व काही माती मोल केलं या करिता शासनाने एकरी पन्नास हजाराची मदत केल्यास शेतकरी तग धरू शकतो याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे. कळंब तालुका येथील तहीलदार, जोडमोहा पठवारी, मंडळ अधिकारी यांनी पाहणी केली असता त्यांनी शासाना कडून आर्थिक मदत केली जाणार असे आश्वासन देण्यात आले खोरद येथील शेतकरी आकाश चव्हान, संदिप काबळे, विजय रनगिरे, विनोद रनगिरे, संजय पोटे, व ईतर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी वरिष्ठांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे

जोडमोहा येथील अनेक घराची पडझड

येथील अनेक घरांच्या भिंती पडल्या,अनेक घरात पाणी शिरले घरे पावसात ओली झाली,अनेक सिमेंट घराचे छत सुद्धा गळणे सुरू झाले आहे त्या मुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे संजय नागपुरे यांच्या घरामध्ये पाणी साचले सायंकाळी 11वाजताच्या दरम्यान घरात समोरील शेजारच्या टिनीच पाणी आत जात असल्याचे नागपुरे परिवारा कडून बोले जात आहे

काल रात्री जोडमोहा सरपंच, पोलीस पाटील, यांनी घराची पाहणी केली व त्या कुटुंबांना ग्रामपंचायत येथे राहण्याची व्यवस्था करून दिली

Copyright ©