Breaking News यवतमाळ

बेचखेड येथे पुरात अडकले दोन वेक्ती

बेचखेड येथे पुरात अडकले दोन वेक्ती

प्रशासनाला माहिती देऊनही एकही अधिकारी घटना स्थळी पोहचले नाही

यवतमाळ तालुक्या अंतर्गत बेचखेड येथील दोन इसम पुरात अडकल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे हे शेतात वण्य प्राण्याचा त्रास असल्याने शेताची राखण करण्यास गेले असता अचानक मुसळधार पाऊस आल्याने ते दोन्ही शेतकरी अडकले या बाबत जिल्हा अधिकारी,तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या की तातडीने बचाव पथक पाठविण्यात यावे अशी मागणी केली परंतु बचाव पथकच यवतमाळ येथे उपलब्ध नसल्याने सर्वत्र चिंतेची बाब निर्माण झाली आहे.नागपूर येथून बचाव पथक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले या बाबत त्वरित उपाय योजना करण्याची मागणी केल्या जात आहे.पाऊस बंद झाल्याने पूर ओसरल्यावर त्या दोन शेतकऱ्यांची सुटका होऊ शकते.

Copyright ©