यवतमाळ सामाजिक

ओ सर ओ सर गणेशपुर गावातील विद्यार्थ्यांना दोन शिक्षक तरी द्या, अशी पालकांची शिक्षण अधिकाऱ्याकडे मागणी

दारव्हा तालुका/ प्रतिनिधी चेतन पवार 

ओ सर ओ सर गणेशपुर गावातील विद्यार्थ्यांना दोन शिक्षक तरी द्या, अशी पालकांची शिक्षण अधिकाऱ्याकडे मागणी

दारव्हा पंचायत समिती अंतर्गत असलेले गणेशपुर या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेवर तात्काळ शिक्षक देण्याची मागणी गणेशपूर येथील विद्यार्थी गावकऱ्याना घेऊन आज दि 20 गुरुवारी शिक्षण अधिकाऱ्याकडे निवेदन दिले, गणेशपुर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण वर्ग 1ते 5 पर्यंत वर्गवारी असून अद्याप पटावर 60 विद्यार्थी आहे, सध्याच्या वेळी आता शाळेवर एक शिक्षक आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याने दिसत,वही बाब गंभीरपूर्वक असल्याने सर्वसामान्य पालक वर्गामध्ये व शिक्षका अभियान केवळ नुकसानीचे बोगस ठरल्याचे दिसून येत आहे,

जिल्हा परिषद मराठी शाळा गणेशपुर येथे वर्ग 1 ते 5 वी वर्गांना 2 शिक्षक तात्काळ तातडीने लगेच 7 दिवसात शिक्षकांची जिल्हा परिषद शाळा गणेश पुर येथे नियुक्ती करण्यात यावी,अन्यथा सर्व विद्यार्थी पालकासह शेताचे काम सोडून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य करिता पंचायत समिती कार्यालय दारव्हा येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षण समितीचे अध्यक्ष, एकनाथ राठोड , चरण आडे रामेश्वर जाधव विजय राठोड राघव राठोड यांनी केला,

गट विकास शिक्षण अधिकारी यांचे प्रतिक्रिया,

मर्यादित शिक्षक संख्या कमी असल्यामुळे आणि पटसंख्या प्रमाणात शिक्षक नाहीत, त्यामुळे मी प्रत्येक गावाला न्याय देऊ शकत नाही , मालेगाव घाटकिन्ही हे दोन गाव असे आहे ,की या गावाला 0 शिक्षक आहे, तरी या दोन्ही गावात तात्पुरता शिक्षकाची व्यवस्था केलेली आहे, आम्ही जिल्हा परिषद च्या वतीने शिक्षक मागून या शाळेत शिक्षक देऊ, अशी प्रतिक्रिया गटशिक्षण अधिकारी विलास जाधव यांनी युवानेते श्याम राठोड उपसरपंच यांना दिली,

Copyright ©