यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत शपथग्रहण सोहळा संपन्न

सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत शपथग्रहण सोहळा संपन्न

लोकशाही,अवगत व्हावी यासाठी शाळेमध्ये छात्रसंसदेची स्थापना,विद्यार्थांनी केले मतदान

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बागडी बीज भांडारचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विदर्भ माहेश्वरी युवा संघाचे माजी अध्यक्ष कमल बागडी उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनिलजी गुगलीया,सचिव श्री.संजय कोचे, कोषाध्यक्ष श्री.मनोज लुणावत, संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री. गणेशजी गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे प्रामुख्याने उपस्थित होते.शालेय जीवनात शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांचा अभ्यास करतांना राजकीय नेतृत्व गुणांचा, कर्तव्यक्षमतेचा, त्यांना विविध जबाबदारीची जाणिव व्हावी,नेतृत्वगुण निर्माण व्हावे, त्यांना लोकशाही शासनपद्धतीचे, निवडणूक प्रकियेचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेमध्ये छात्रसंसदेची स्थापना करावी लागते.त्यासाठी सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांची ब्लू हाऊस, रेड हाऊस , ग्रीन हाऊस, यलो हाऊस,गृहानुसार विभागणी करण्यात आली. लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांची निवडणूक घेण्यात आली.निवडणुकीमध्ये इयत्ता ९ वी व १० वी मधून विद्यार्थी प्रतिनिधी साठी इच्छुक विद्यार्थ्यांची सार्वत्रिक मतदानाद्वारे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. शपथविधी सोहळ्याद्वारे हेड बॉय म्हणून शिवा जयस्वाल,हेड गर्ल म्हणून अदिती रानडे यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांच्या हस्ते शालेय ध्वज, स्लॅशेस व बॅचेस देऊन पदभार सोपविण्यात आला. सहायक हेड बॉय सोहम निकम,सहायक हेड गर्ल तृप्ती कोमावार यांना शाळेचे उपाध्यक्ष सुनिलजी गुगलीया यांच्या हस्ते स्लॅशेस व बॅचेस देऊन पदभार सोपविण्यात आला. क्रीडा प्रतिनिधी म्हणून वेदांत शिरभाते,दर्शिका मिरासे यांना संस्थेचे सचिव संजय कोचे यांच्या हस्ते स्लॅशेस व बॅचेस देऊन पदभार सोपविण्यात आला. आरोग्य व स्वच्छता प्रतिनिधी म्हणून सार्थक निकम व मेघा गटफने यांना संस्थेचे सदस्य गणेशजी गुप्ता यांच्या हस्ते स्लॅशेस व बॅचेस देऊन पदभार सोपविण्यात आला.त्याबरोबरच ब्लू हाऊस प्रतिनिधी म्हणून मंदार बोरकर,आर्या बेंद्रे, गार्गी पखाले,सार्थक पथ्ये, रेड हाऊस प्रतिनिधी म्हणून कपिश जयस्वाल,कृष्णा चोरे, सुजल फाळके, दिव्या भांबेरे, ग्रीन हाऊस प्रतिनिधी म्हणून कृष्णा मोरे,अन्वेषा चांदेकर, शिवम शुक्ला व गणिका जांगीड, यलो हाउस प्रतिनिधी म्हणून अभिषेक बखाल,ख़ुशी ओसवाल, ओम मोकलकर व दिव्या तपके या विद्यार्थ्यांना शाळेतील चारही गृहातील प्रतिनिनिधींना त्यांच्या गृह शिक्षक प्रमुखाद्वारे गृह ध्वज,स्लशेस व बॅचेस देऊन पदभार सोपविण्यात आले. तदनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे यांच्या हस्ते छात्रसंसदेतील सर्व सदस्यांना आपल्या कर्तव्याप्रती,शाळेप्रती कसे प्रामाणिक,सजग व तत्पर राहावे याची जाणीव करून त्यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे श्री.कमल बागडी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना छात्रसंसदेचे महत्व, जबाबदारी, नेतृत्वगुण, कौशल्य व असफलतेकडून सफलतेकडे जीवनामध्ये कशी वाटचाल करायची या बाबी विद्यार्थ्यांना पटवून दिल्या.अशाप्रकारे हम को मन कि शक्ती देना………… मन विजय करे या प्रार्थनेद्वारे शपथविधी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. वैशाली चौधरी ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे मोलाचे सहकार्य लाभले.

Copyright ©