महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मोहम्मद तारिक लोखंडवाला यांची नियुक्ती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मोहम्मद तारिक लोखंडवाला यांची नियुक्ती

यवतमाळ/महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मोहम्मद तारिक मोहमद समी लोखंडवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गुरुवार 20 जुलै रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मो. तारीक लोखंडवाला यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष पदासाठी नियुक्ती करतांना त्यांनी पक्ष

वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे राबवून जनसामान्यांसाठी कार्य करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.पक्षाची विचारधारा सर्वसामन्यापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील अस

विश्वास यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त करीत नवनियुक्त कार्याध्यक्ष मो.तारीक लोखंडवाला यांचे सर्वांनी अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.उल्लेखनीय म्हणजे मो तारीक लोखंडवाला अनेक वर्ष पासून जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून आतापर्यंत त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध कार्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष वाढ,संघटन बांधणी व पक्षाला जिल्ह्यात संजीवनी देण्याचे कार्य करीत आहेत,त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकारीमध्ये लोकप्रिय आहेत.त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती प्रसंगी आमदार इंद्रनील नाईक,राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव गुल्हाने, बाळासाहेब चीमुरकर,सागर उर्फ लालजी राऊत योगेश धानोरकर, नयन लुंगे,सोनू उप्पलवार यांच्या सह अनेक मान्यवर हजर होते.त्यांच्या निवडीचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Copyright ©