यवतमाळ सामाजिक

शासकीय रुग्णालयात रक्ताच्या तुटवड्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात

शासकीय रुग्णालयात रक्ताच्या तुटवड्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात

वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना रक्त वेळेवर उपलब्ध होत नाही. देविदास कोवे, राहणार खटेश्वर, व्यवसाय गुराखी, यांचा हात फॅक्चर झाला असून हे गेल्या आठ दिवसांपासून शासकीय रुग्णालयात भरती असून डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितले परंतु शस्त्रक्रिया करण्या करिता रक्ताची आवश्यकता आहे, रक्त उपलब्ध झाल्याशिवाय ऑपरेशन करता येणार नाही असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. हा प्रकार आम आदमी पार्टी चे दिवाकर गायकवाड राहणार खटेश्वर यांनी आज गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी आम आदमी पार्टी चे यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर यांना कळविल्यावर त्यांनी त्वरीत ओ – पॉ. रक्तगट असलेल्या रक्त दात्याचा चा शोध घेऊन पीडित रुग्णास रक्त उपलब्ध करून दिले. यावेळी यवतमाळ तालुका सचिव यांचे वर्ग मित्र जय पंडित राहणार लोहारा यांनी रक्तदान केले. यावेळी यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख, रुग्णसेवक सुरजीत सिंग राठोड, सुशांक रनगिरे हे उपस्थित होते.

Copyright ©