Breaking News महाराष्ट्र

वाहितपुर येथील मोटरपंप चोरट्यांना पोलिसांचे अभय

वर्धा जिल्हा प्रतिनिधी पंकज तडस

वाहितपुर येथील मोटरपंप चोरट्यांना पोलिसांचे अभय

तीन दिवसापासून अटक नाही.

सेलू तालुक्यातील वाहितपूर येथील एका मोटरपंप दुरुस्ती केंद्रातून सतत 7 मोटारपंप चोरून नेणारे चोरट्यांचां सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद होऊन याची सेलू पोलिसात 3 दिसापासून तक्रार दाखल करूनही या चोरट्यांना सेलू पोलिसांनी अटक केली नसल्याने त्यांना पोलीस अभय देत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की वाहितपुर ता.सेलू येथे श्री. डायगव्हाणे यांचे मोटरपंप दुरुस्ती केंद्र आहे. त्यांच्याकडे परिसरातील तसेच दूरचे शेतकरी मोटारपंप दुरुस्ती करीता आणतात. त्यामुळे त्यांच्याकडे मोटारी ठेऊन असतात.

गेल्या दोन तीन महिन्यात त्यांच्या 7 मोटरपंप चोरीला गेले.

याबाबत त्यांनी सेलू पोलिसात 3 तक्रारी दिल्या आहे.

तीन दिवसापूर्वी 2 मोटरपंप चोरी गेले त्याचे सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये आरोपी कैद झाले. याचे सर्व फुटेज सेलू पोलीस यांना देऊनही आरोपींवर कारवाई करण्यात कसूर करीत आहे.

त्यामुळे सेलू पोलीस चोरट्यांना अभय देत असल्याचे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

याच आरोपींनी करंजी भोगे आणि करंजी काजी येथील अनेक शेतकऱ्यांचे मोटरपंप चोरून नेल्याची घटना आहे.

त्यामुळे या अट्टल चोरट्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Copyright ©