महाराष्ट्र यवतमाळ

नितीन सिंघवी यांना पीएच्.डी. पदवी प्राप्त

नितीन सिंघवी यांना पीएच्.डी. पदवी प्राप्त

धामणगांव रेलवे येथील आदर्श महाविद्यालयामधील सहयोगी प्राध्यापक नितीन सिंघवी यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या पीएच.डी. शोध-प्रबंधाचा विषय “विदर्भ के ग्रामीण क्षेत्रों में उपभोक्ता क्रय व्यवहारों का विश्लेषणात्मक अध्ययन (कालखण्ड 2015-2020)” हा होता. डॉ. जयंतकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन सदर संशोधन कार्य त्यांनी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती या शोधकेंद्रावरून पूर्ण केले. यासाठी शोध केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ. विजय भांगडिया, धामणगांव एज्यूकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष शरदकुमारजी अग्रवाल, माजी उपाध्यक्ष प्रदीपबाबूजी लुनावत, माजी सचिव डॉ. प्रकाश राठी, डॉ. अशोक संकलेचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. रमेशचंद्रजी चांडक, उपाध्यक्ष अरविंद कुमारजी अग्रवाल, सचिव एड. आशिषकुमारजी राठी, सहसचिव डॉ. असितजी पसारी, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेंद्र गांडोले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. डॉ. आनंद नरांजे व महाविद्यातील सर्व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. नितिन सिंघवी यांनी आपल्या या यशाचे श्रेय मार्गदर्शकांसोबतच आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना दिले.

Copyright ©