महाराष्ट्र सामाजिक

तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- पंकज तडस 

तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यातील आरोग्य संस्था तंबाखुमुक्त घोषित करण्यात आलेल्या असतांनाही आरोग्य संस्था परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खावून थुंकतात असे आढळून आले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालय परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

रुग्णालय परिसरात येणारे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक तंबाखु, गुटखा तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थ खावुन थुंकतात. त्यामुळे रुग्णालयीन परिसर व आरोग्य संस्थेमध्ये घान निर्माण होऊन अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होते. या दुष्परिणामाची जागरुकता निर्माण करुन सदर कारवाई करण्यात आली आहे.

अशा प्रकारची कारवाई दररोज करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी तंबाखु नियंत्रण समितीच्या पथकाला दिले आहे. यामध्ये केंद्र शासनाचा तंबाखु आणि तंबाखुजन्य पदार्थ कायदा 2003 मधील कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच तंबाखुमुक्त परिसरामध्ये तंबाखु, गुटखा तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थ खाणे, खावून थुंकणे, खावुन येणे, जवळ बाळगणे यावर बंदी असून असे करतांना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कार्यवाही केल्या जाणार आहे. असे करतांना आढळल्यास संबंधित संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. तंबाखु मुक्तीसाठी 1800112356 क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

Copyright ©