महाराष्ट्र सामाजिक

नगरपरिषद अंतर्गत निकृष्ट दर्जाची विकासाची कामे सु्रूच

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

नगरपरिषद अंतर्गत निकृष्ट दर्जाची विकासाची कामे सु्रूच

केदार लेआउट मध्ये अंदाजपत्रकानुसार होत नाही रस्त्याचे काम

नागरिकांनी दिली मुख्य अधिकाऱ्याला लेखी तक्रार

देवळी शहरामध्ये केदार लेआउट मधील प्रशांत चहारे ते लाडेकर यांच्या घरापर्यंत होणाऱ्या रस्त्याचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत आहे.सुरू असलेल्या रस्त्याचे बांधकाम दिलेले अंदाजपत्रकानुसार होत नसून अंदाजपत्रकामध्ये हार्ड मुरूम,सॉफ्ट मुरूम,चा उल्लेख असतांना निकृष्ट अशा डस्ट सर्रास वापर सुरू आहे. सध्या रस्ता बांधकामाच्या सुरुवातीला संबंधित ठेकेदार अंदाजपत्रकातील कामे डवलून मन मर्जीने काम करीत आहे.

हे सर्व निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना नागरिकांनी आरड ओरड सुरू केली केदार लेआउट मधील रहिवाशी भूषण अशोकराव कडू यांनी नगरपरिषद कार्यालयात लेखी तक्रार देऊन निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम त्वरित बंद करण्यात यावे तसेच ठेकेदारावर कारवाई करावी अशी लिखित तक्रार नगर परिषद मुख्य अधिकारी सौरभ कावळे यांना दिली.

बांधकाम ठेकेदारावर नजर ठेवल्याचे काम नगरपरिषद बांधकाम अभियंता राजेश ढोले यांच्याकडे आहे परंतु या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरत असतानाही नगरपरिषद बांधकाम अभियंत्याचे याकडे लक्ष का गेले नाही? असा प्रश्न केदार लेआउट मधील रहवाशी करीत आहे. जेव्हा केदार लेआउट मधील रहवाशांनी लिखित तक्रार नगरपरिषद कार्यालय मध्ये दिल्यावर तेव्हा बांधकाम अभियंत्यास जाग येतो आणि ते बांधकाम ठेकेदारास नोटीस देऊन विचारणा करतात. देवळी शहरांमध्ये नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या खेळ खेळोबा कधी थांबणार असा प्रश्न देवळीकरांना पडला आहे या बांधकाम ठेकेदारांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यासाठी जो कोणता अधिकारी यांना डोळे झाक करून प्रोत्साहन देत आहे त्या अधिकाऱ्यावर मुख्याधिकारी सौरभ कावळे कारवाई का करीत नाही त्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय का देत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Copyright ©