यवतमाळ सामाजिक

वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप

वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप

यवतमाळ -: वसुंधरा फाउंडेशन गेल्या 6 वर्षांपासून यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवते.महिला सक्षमीकरण, युवा रोजगार या विषयावर काम करते. महिला विद्यालयामध्ये कार्यक्रम घेताना तेथील व्यवस्थापनाने वसुंधरा फाउंडेशनकडे त्यांची महत्त्वाची अडचण सांगितल्या.त्यात प्रामुख्याने सॅनिटरी पॅड नष्ट करताना मुलींकडून अनेकदा ते शौचालयात टाकले जातात. त्यामुळे शौचालये तुंबून जातात.आणि गंभीर समस्या निर्माण होते.आणि या भिती मुळे मुली दिवसदीवस भर पॅड बदलवित नाही व यामुळे आजारपण तयार होते. खास करून महिला विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये ही समस्या वारंवार जाणवते.हे टळावे यासाठी या महिला विद्यालय,महाविद्यालयांना सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन आवश्यक असल्याने

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ,मुख्य वन संरक्षक धनंजय वायभासे, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण तसेच प्रा. घनःश्याम द रणे,प्रा. डॉ.सीमा शेटे, प्रा. डॉ.विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीन शिवाजी शाळेच्या अमृता वढेरा,अंजली काळे,चारुदत्त देवतळे,सुमन माहेर मुलीचे वसतिगृहाच्या अश्विनी चव्हाण, वेदधारीणी माध्यमिक विद्यालयाच्या भारती नेमाडे पाटील व प्रविण धुमणे यांच्या सुपूर्द केल्या गेल्या. यावेळी वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, वर्षा पडवे,उपाध्यक्ष, धीरज चिव्हाने,माधुरी कोटेवार,योगिता मासाळ,नीलम डोंगरे, नेहा शर्मा, जया सलुजा, सुचिता नागोसे आदी उपस्थित होते.

Copyright ©