Breaking News यवतमाळ

ऑटो चां कट का मारला या कारणावरून चक्क घरावर केला हल्ला

ऑटो चां कट का मारला या कारणावरून चक्क घरावर केला हल्ला

एक झन अजूनही बे पत्ता, तीन दिवस होऊनही आरोपी मोकळेच,

दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत राम गाव रामेश्वर येथील शुल्लक कारणावरून महिला समवेत अनेकांना मारहाण करण्यात आली तर या मधील एकाचा अजूनही पत्ताच नसल्याने पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.सविस्तर असे की रामगाव रामेश्वर येथील

ऑटो चा कट लागल्याच्या कारणावरून घरावर प्राण घातक हल्ला करण्यात आला ही घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली याप्रकरणी 15 ते 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला प्रमोद परशुराम जाधव राहणार रामगाव रामेश्वर यांच्या दुचाकीला सचिन मडकाम याच्या ऑटो नी कट मारला ही बाब त्याला विचारणा केली असता त्याने वाद घातला आणि घरी जाऊन त्याने आपल्या नातेवाईका ला घेऊन पंधरा ते वीस जणांच्या जमा करून फिर्यादीच्या घरी आले हातातील लाठ्या काठ्या घेऊन प्रमोद जाधव व त्यांच्या घरातील नातेवाईकांना बेदम मारहाण करण्यात आली यात प्रमोद जाधव जखमी झाले सोबतच महिलांना हि बेदम मारहाण करण्यात आल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली होती यात दिपाली,सिल्पा,ललिता,कारण चव्हाण, व सुरेश चव्हाण यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यांच्या फिर्यादी वरुन आरोपी शुभम बोरकर संतोष मडकाम वय २२, बंटी रोडगे वय २५,रुपेश गजबे, आशिष बुरांडे, वय ३६ व इतर दहा ते बारा आरोपी विरुद्ध ३२४,१४३,१४७,१४८,५०४ ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांनी आरोपींना अभय देत त्यांना अजूनही अटक केली नाही तर अजय जाधव अजूनही बेपत्ता असतानाही पोलीस शोध घेत नसल्याचे दिसून येत आहे हि घटना १६ जुलै २०२३ ला रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.जाधव परिवार अजूनही भीतीच्या वातावरणात राहात असून त्या हल्ले खोराना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©