महाराष्ट्र सामाजिक

मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवे.

मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवे.

आज दिनांक 17 जुलै 2023 रोजी आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने लिंगभाव समानता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. पांडुरंग हटकर, अध्यक्ष. शारदा ठिकार, संचालक-राहुल सुरवाडे ,कार्यक्रमाचे उद्घघाटक-श्रद्धा सिसोदिया, प्रमुख पाहुणे-आम्रपाली शेगोकार, सरपंच-पूजाताई वाघमारे, नंदबाई सुरवाडे, सीमाताई पाटील, सत्यभामा करंगाळे, प्रमिला सुरवाडे, काजल सुरवाडे, तसेंच शाळेचे मुख्याध्यापक दिनेश कुमार चोपडे, कपिलदेव अवचार, पत्रकार- सचिन बोहरपी , अंगणवाडी सेविका, सुमित्रा खरात, शारदा टीकार , शेहनाज पठाण, निर्मला बोचरे, सीता टीकार ,ललिता सुरवाडे सायरा, बानो, तसेंच इंगळे मॅडम, थोटे मॅडम, टिकार मॅडम व आशा वर्कर शशिकला सुरवाडे उपस्थित होते.

यावेळी डॉ. हटकर यांनी सांगितले कीं, आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामीण स्तरावर मुलींना प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी सामाजिक बदला साठी लिंगभाव समानता कार्यशाळा व त्या माध्यमातून चला तिला समजून घेऊया कळी उमलताना असे प्रोग्रॅम घेऊन गाव पातळीवर एक सकारात्मक संदेश देण्याचे काम करत आहात याचा समाजावर नक्कीच चांगला परिणाम पडेल असा आशावाद वाटतो.!

तर संस्थेचे संचालक राहुल सुरवाडे यांनी कार्यशाळा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली, त्यामध्ये त्यांनी सांगितले की, मुलगी स्त्री म्हणून जन्मत नाही तर ती घडवली जाते. समाजामधील आत्मभान आपल्याला बदलायचा असेल तसेंच आज दिवसेंदिवस होत असलेल्या मुलींवरील अत्याचार थांबवायचं असेल तर स्त्रीला आत्मसन्मानाने व मानवतेने जगवावं लागेल त्यासाठी चला तिला समजून घेऊया याशिवाय पर्याय नाही. म्हणून लिंगभाव समानता कार्यशाळा आयोजित करित आहोत.

सिसोदिया मॅडम नी सांगितले कीं, मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवे त्यातून नक्कीच एक क्रांती घडेल.

यावेळी मोठ्या प्रमाणात स्व.कृष्णराव रामजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय व स्व. भैय्याभाऊ पाटील उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिंडे सर, हिवरकर सर पाटेखेडे सर लक्ष्मी सुरवाडे, नंदाबाई सुरवाडे, तृप्ती टिकार, रिना, गायत्री, पल्लवी अवचार, अरुणा, विद्या, मंगला, तृप्ती टिकार, नाजीया शेख, मिनलताई यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दिक्षा सुरवाडे, सोनाली इखारे यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजस्विनी इखारे यांनी केले.

Copyright ©