यवतमाळ सामाजिक

न.प.च्या आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोहनाबई शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे विध्यार्थी मुलींनी रस्ता बंद करून केले ठिय्या आंदोलन

दिग्रस प्रतिनिधी

न.प.च्या आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोहनाबई शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे विध्यार्थी मुलींनी रस्ता बंद करून केले ठिय्या आंदोलन

24 तासात प्रवेश मिळवून देण्याचे गट शिक्षण अधिकारि मुकेश कोंडावार यांचे आश्वासन

शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे माजी नगरसेवक सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात पालकासह विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या गेटवर रस्ता रोखून ठिय्या आंदोलन केले नगरपरिषद शाळा क्रमांक दोन मधील सपना खुशाल चौधरी, समरीन युसूफ परसुवाले, सना बिलाल मीरावाले, चाहत हबीब खान, फरहीन अंजुम तोफिक खान, शिरीन कौसर मजीद खान, सय्यद मोहिमोदिन सय्यद रफीयोदिन, सय्यद गुफ्रान सय्यद मजीद, खंडू देवानंद इंगोले, कय्युम महेबूब पप्पूवाले, जगदीश मच्छिंद्र भवरे, शेख मुजीब सलीम असे एकूण 12 विद्यार्थी आठवा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक दोन यांचे मुख्याध्यापक यांनी रितसर शहरातील मोहनाबाई कन्या शाळा, राष्ट्रीय विद्यालय आणि दिनबाई विद्यालय या शाळेला प्रवेशासाठी 17 मे 2023 रोजी विनंती अर्ज केला होता परंतु संबंधित शाळेकडून प्रवेश नाकारला परंतु पुढील शिक्षणासाठी हे विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून माजी नगरसेवक सय्यद अक्रम यांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या गेटवर प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह रस्ता बंद करून ठिय्या आंदोलन केले. नगरपरिषद असो की जिल्हा परिषद गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना नाही प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था नाही माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था नाही. आजच्या आधुनिक काळात हे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेण्यासाठी धडपडत असतील रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील तर ही बाब चिंतेची आहे यावर ठोस उपाययोजना शिक्षण विभागाने करणे गरजेचे आहे असे मत आज या आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी व्यक्त केले

Copyright ©