यवतमाळ सामाजिक

खांद्यावर सिलेंडर वाहणाऱ्या मजुराचा मुलाची मंत्रालयात लेखापाल पदी निवड

खांद्यावर सिलेंडर वाहणाऱ्या मजुराचा मुलाची मंत्रालयात लेखापाल पदी निवड

ग्रामपंचायत सदस्यांनी मुला सोबत पालकांचाही केला सन्मान

यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील सामान्य कुटुंबातील विवेक योगिराज ठाकरे यांची मंत्रालयात वरिष्ठ लेखापाल पदी नियुक्ती झाल्याने हिवरी वासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला
सवी असे की विवेक यांचे वडील घरोघरी जाऊन सिलेंडर पोहचविण्याचे काम करतो तर आई मोल मजुरी करून आपली व आपल्या परिवाराची उपजीविका करतात मुलाची जिद्द पाहून वडिलांनी प्रोत्साहन देत मी वाट्टेल ते काम करतो तुला जेवढे शिकता येईल तेवढे शिक मी तुला काही कमी पडू देणार नाही पण शिक्षण घ्यायचं म्हंटल तर पैसाच पाहिजे आणि मजुरीच्या पैशावर शिक्षण होत नाही हे विवेकला कळून चुकले होते.

घरची परिस्थिती जेमतेम, घरात अठरा विश्व दारिद्र्य पण याही परिस्थितीत जिद्द एकच होती आणि ती म्हणजे शासकीय नोकरी.
कधी वाटत होतं की, एखादं काम करून आई-वडिलांना संसारात हातभार लावाव, कधी वाटत होतं कुठे काम करून शिक्षण पूर्ण करावं, कधी वाटत होतं आता थांबलं पाहिजे घरच्यांसाठी तरी किती दिवस ओझं बनून राहायचं पण जिद्द ध्येयाच्या विरोधात जाऊ देत नव्हती आणि अशातच सुरू झाला एक संघर्षमय प्रवास.
आणि या प्रवासाचं फलित देखील झालं

नुकताच महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक पदाचा निकाल जाहीर झाला. अतिशय अवघड असणाऱ्या या परीक्षेत हिवरी येथील विवेक योगीराज ठाकरे यांने यश संपादन केले. विवेक हा सामान्य कुटुंबातील विद्यार्थी . घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कधी विवेक स्वतः रोज मजुरी सुद्धा करायचा. विवेकचे शालेय जीवनापासूनच महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची नोकरी मिळविण्याचे स्वप्न होते आणि याकरिता तो वर्ग बारावी झाल्यापासूनच आपल्या यशाच्या वाटेने घोडदौड करीत होता. त्याने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण शासकीय आदिवासी आश्रम शाळा, हिवरी व महाविद्यालयीन शिक्षण बाबाजी दाते महाविद्यालयात पूर्ण केले. विवेकला शिक्षण घेत असताना आई-वडिलांचा पाठिंबा असायचा. म्हणूनच विवेक आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक व सहकारी मित्रांना देत असून शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा व आपल्या पदाला न्याय देण्याचा निर्धार विवेकनी व्यक्त केला असून आई-वडिलांचे कष्ट डोळ्यापुढे ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच यश संपादन करणे सहज शक्य झाले असे मत विवेक योगीराज ठाकरे याने व्यक्त केले.
आणि या मैदान मारलं महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन विभागात लिपिक पदावर निवड झाली. याचाच अभिमान प्रत्येक गावकऱ्यांना होत असून विवेक व त्याच्या आई वडील आणि आजीचा ग्रामपंचायतीचे सदस्य अनंत रामचंद्र राऊत,संध्याताई अतकरी,सिद्धार्थ भगत,संदीप खोडकुभे,वृषभ माहुरे,ओंकार चेके,सुषमा राऊत,विठोबा कोडापे सरपंच,उपसरपंच इत्यादींनी विवेक यांच्या घरी जाऊन परिवाराचा सत्कार केला व सुखी व उज्वल यशा करीत शुभेच्छा दिल्या.

Copyright ©